chandrakant Patil sakal
पुणे

Karve Road Parking : कर्वे रस्त्यावरील पार्किंग होणार पूर्ववत - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मेट्रो व उड्डाणपुलाच्या कामांमुळे गेल्या चार वर्षापासून बंद झालेले कर्वे रस्त्यावरील ‘नो पार्किंग’ हटवून त्या ठिकाणी पुन्हा दुतर्फा पार्किंग उपलब्ध करण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी महापालिकेत केली. या बाबत कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन, मनसेची जनाधिकार सेना यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. ‘सकाळ’नेही या बाबत पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे ग्राहक- व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मेट्रो, उड्डाण पूल यांच्या कामांमुळे बंद झालेले पार्किंग आता सर्व कामे झाली असल्यामुळे पूर्ववत करावे, या मागणीसाठी पुणे व्यापारी महासंघ, कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन आणि मनसेची जनाधिकार सेना बुधवारी आंदोलन करणार होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी कर्वे रस्त्यावरील पार्किंगसंदर्भात महापालिकेत बैठक घेतली.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार, वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, कर्वे रस्ता व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका तसेच उपाध्यक्ष अजित सांगळे, महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष हेमंत संभूस, विनिता ताटके, प्रियांका पिसे, रोहित गुजर, संतोष पाटील, केदार कोडोलीकर, आकाश बुगडे, राहुल वानखडे आदी त्यात सहभागी झाले होते.

कर्वे रस्त्यावर खंडुजीबाबा चौक ते हुतात्मा राजगुरू चौकापर्यंत (करिश्मा सोसायटी परिसर) दोन्ही बाजूस ‘नो पार्किंग’मुळे या रस्त्यावरील व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. मेट्रो व उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होऊन एक वर्ष उलटून गेला तरीही नो पार्किंग हटविण्यासंदर्भात निर्णय होत नव्हता. वाहतूक पोलिसांनी महापालिकेला पत्र पाठवून कर्वे रस्त्यावर काही ठिकाणी दुचाकी तर काही ठिकाणी चारचाकी पार्किंग सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता.मात्र, निर्णय होत नव्हता. अखेर आज पालकमंत्री पाटील यांनी बैठक घेऊन पार्किंगचा प्रश्न मार्गी लावला.

‘कर्वे रस्त्यावरील पार्किंग समस्येवर आज बैठक घेतली. व्यावसायिकांच्या व नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत नाही अशा ठिकाणी पोलिसांनी पाहणी करून नो पार्किंगचे बोर्ड काढून टाकावेत व पार्किंग सुरू करावी. व्यावसायिक, स्थानिक रहिवासी यांची समस्या त्वरित सोडवावी असे आदेश आजच्या बैठकीत दिले आहेत.’

- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

‘कर्वे रस्त्यावरील पार्किंग सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय आज घेतला आहे. वाहतूक पोलिस आणि स्थानिक नागरिक प्रत्यक्ष जागा पाहणी करून कुठे पार्किंग करायचे याचा निर्णय घेऊन वाहतूक पोलिस आदेश काढतील.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

‘विकास प्रकल्पाला सहकार्य करण्यासाठी कर्वे रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी प्रशासनाला चार वर्ष सहकार्य केले. पार्किंग मिळावे, यासाठी ‘सकाळ’ने मोलाचे सहकार्य केले. कर्वे रस्त्यावर पार्किंग सुरू करण्याच्या आमच्या पाठपुराव्याला यश आले.’

- हेमंत संभूस, प्रदेशाध्यक्ष, मनसे जनाधिकार सेना

‘पार्किंग नसल्यामुळे कर्वे रस्त्यवरील व्यावसायिक आणि ग्राहकांना अनेक अडचणी येत होत्या. प्रशासनाने आता या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी.

- ओमप्रकाश रांका, अध्यक्ष, कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Bagwe: पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! बागवे पिता-पुत्र भाजपच्या वाटेवर? फडणवीसांची घेतली भेट

Shreya Ghosal Viral Video : गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यात चाहत्याला श्रेयाने केली अशी मदत ; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Nana Patole: नाव बदललं तरी भाजपच्या यादीत 'औरंगाबाद' उल्लेख; नाना पटोलेंनी सांगितलं कारण

Parvartan Mahashakti List : तिसऱ्या आघाडीची 10 उमेदवारांची यादी जाहीर; बच्चू कडूंसह 'हे' उमेदवार रिंगणात

Latest Maharashtra News Updates : देवगिरी बंगल्यावर आतापर्यंत आलेले आमदार, उमेदवार

SCROLL FOR NEXT