Pune Katraj Dairy  sakal
पुणे

Pune Katraj Dairy : 'दूध उत्पादकांना थेट ५ रुपये अनुदान देण्याची मागणी'

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षांनी मांडल्या दूध उत्पादकांच्या समस्या

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

Pune News : दूध भुकटीचे घसरलेले दर पर्यायाने दूध दरामध्ये झालेली घसरण लक्षात घेता शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर थेट प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) अध्यक्ष भगवान पासलकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत नागपूर येथे झालेल्या बैठकीत ही मागणी केली आहे.

त्याचबबरोबर यावेळी त्यांनी दूध उत्पादकांच्या विविध समस्या आणि अडचणी मांडल्या. राज्यातील दूध उत्पादकांचे प्रश्न तसेच दूधदरामध्ये मोठी घसरण झाल्याने नागपूर येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

थेट शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान दिल्यास दिलासा मिळेल. सद्यस्थितीत दुधाचे दर २५ ते २६ रुपये प्रति लिटरपर्यंत खाली आले आहेत. पशुखाद्य आणि चाऱ्याच्या वाढत्या किमती तसेच उत्पादन खर्च याचा विचार करता शेतकऱ्यांना प्रतिलिटर चार ते पाच रुपये तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनुदान देण्याचा निर्णय तत्काळ दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल, असे त्यांनी म्हटले आहे.

पुणे जिल्हा दूध संघाचे सध्या सरासरी दैनंदिन गायीच्या दूध संकलनापैकी ८० ते ८५ हजार लिटर दूध पॅकिंगद्वारे विक्री करण्यात येत आहे. तर १० हजार लिटर दूध हे पॅकिंग विक्री होते. मात्र, उर्वरित शिल्लक दूध २९ रुपये दराने खाजगी डेअरीला विकण्यात येत असल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

यामुळे शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे किंवा शिल्लक अतिरिक्त दूध सरकारने रुपांतरणासाठी घ्यावे. जेणेकरुन संघाला आणि शेतकऱ्यांना तोटा होणार नाही, अशी मागणी संघाकडून करण्यात आलेली आहे.

विक्री दरापेक्षा सातत्याने खरेदी दर वाढवून दिला जात असल्याने संघाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनुदान दिल्यास हा तोटा कमी होण्यास मदत होईल. याबाबतीची मागणी बैठकीत तसेच, निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. - भगवान पासलकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा दूध संघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT