Pune News sakal
पुणे

Pune News: खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्ग मंचर भुयारी मार्गाचे काम संतप्त गावकऱ्यांनी पाडले बंद

भुयारी मार्गाचे काम बंद पाडले होते

डी.के वळसे पाटील

मंचर : खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर भोरवाडी-तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे बाह्यवळण रस्त्यानजीक सध्या सुरू असलेल्या भुयारी मार्ग पुलाची उंची फारच कमी आहे. त्यामुळे भविष्यात उसाचे ट्रॅक्टर व माल वाहतूक ट्रक ये-जा करू शकणार नाहीत.

या भुयारी मार्गाची उंची ४.२ मीटरने वाढवावी या मागणीसाठी भोरवाडी व तांबडेमळा ग्रामस्थांनी भुयारी मार्गाचे काम बंद पाडले होते. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक अभियंता दिलीप मेदगे यांनी ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत चर्चा करून प्रश्न मार्गी लावू.” असे आश्वासन दिल्यानंतर थांबलेले भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले.

आंबेगाव तालुका पंचायत समिती माजी उपसभापती संतोष भोर, संदीप भोर, संजय भोर,यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी भुयारी मार्गाचे काम बुधवारी (ता.४) बंद पाडले होते. संतोष भोर म्हणाले “ दिलीप वळसे पाटील यांना भोरवाडी व तांबडेमळा गावकऱ्यांचे शिष्ठमंडळ भुयारी मार्ग कामाबाबत चार महिन्यापूर्वी भेटले होते.

त्यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व टीएनटी कंपनी (कंत्राटदार) यांच्याबरोबर चर्चा करून भोरवाडी व तांबडेमळा येथील गावकऱ्यांच्या दळणवळणासाठी ४.२ मीटर उंचीचा भुयारी मार्ग करण्याविषयी सूचना दिल्या होत्या.त्यानुसार सदर कामाला मंजुरी ही मिळाली होती.

पण प्रत्यक्षात मात्र ३.५ मीटर उंचीचे भुयारी मार्ग पुलाचे काम सुरू आहे. हा प्रकार लक्षात आल्यामुळे गावकरी संतप्त झाले. भविष्यात उसाचे ट्रॅक्टर ये-जा करू शकणार नाहीत. या भुयारी मार्गाचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी काम बंद पाडले होते. मेदगे यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक अभियंता संजय कदम यांच्याबरोबर चर्चा केली.यासंदर्भात कदम यांनी टीएनटी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर आंदोलन मागे घेतले.

भुयारी मार्गाचे काम 4.2 मीटरनेच मंजूर झाले आहे. पण ठेकेदाराने झोल करण्यासाठी 3.5 मीटर चे काम सुरू केले होते. गावकऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यामुळे त्यांना आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागला असे ग्रामस्थांनी सांगितले. आतापर्यंत झालेल्या सर्व रस्त्याच्या कामाची चौकशी मोजमाप घेऊनउच्चस्तरीय समिती नेमून करावी. अशी मागणी केली जात आहे.

भोरवाडी येथून अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी तांबडेमळा हद्दीतील स्मशानभूमीकडे जावे लागते. पण भोरवाडी ते भुयारी मार्ग या रस्त्याच्या पूर्व बाजूने सर्विस रस्ता केलेला नाही. सदर सर्विस रस्ता व ओड्यावर लहान पूल करावा. अशी मागणी संदीप भोर यांनी केली.

तांबडेमळा व भोरवाडी (ता.आंबेगाव) गावकऱ्यांची सर्विस रस्त्याची मागणी रास्त आहे. अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी ये-जा करताना राष्ट्रीय महामार्ग ओलांडणे धोक्याचे आहे. कारण दक्षिण बाजूने उतार असल्याने येणारी वाहने भरधाव असतात. त्यासाठी भोरवाडी ते भूयारी मार्गापर्यंत सर्विस रस्ता व लहान पूल होण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.”

अभियंता दिलीप मेदगे, समन्वयक पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग.

भोरवाडी-तांबडेमळा (ता. आंबेगाव): खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळण रस्त्यानजीक भुयारीमार्गाबाबत पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक अभियंता दिलीप मेदगे (मध्यभागी) यांच्याबरोबर चर्चा करताना ग्रामस्थ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT