पुणे

Pune Travel: मोठी बातमी! लॉन्गविकेंड सुरू असताना लवासा सिटी पर्यटनासाठी पूर्णतः बंद, जाणून घ्या काय आहे कारण?

सकाळ वृत्तसेवा

धोंडिबा कुंभार , पिरंगुट

Mulshi News : येथील पर्यटन पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांनी दिले आहेत. त्यामुळे आज शनिवार दिनांक १७ रोजी सुट्टीचा दिवस असूनही लवासा सिटीत पर्यटकांअभावी सर्वत्र सन्नाटा पसरला होता.

येथील लवासाच्या टाऊन हॅाल परिसरातील मुख्य बाजारपेठ , बंधाऱ्यावरील भिंतीचा रस्ता , घाट रस्त्यातील धबधबे तसेच वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्राचा परिसरात शुकशुकाट होता. हिरमोड झालेल्या पर्यटकांना टेमघर धरणाच्या पायथ्यापासूनच हुरमुसल्या चेहऱ्यांनी माघारी फिरावे लागत असल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे टेमघर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या लव्हार्डे परिसरातील लवासाकडे जाणारा रस्ता खचला आहे.

त्यामुळे स्थानिकांची आणि लवासातील शाळा , महाविद्यालय तसेच प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून बांधकाम विभागाने त्या ठिकाणच्या बाजूच्या पर्यायी रस्त्यावर मोऱ्य़ा टाकून तात्पुरता रस्ता तयार केला आहे. मात्र त्या रस्त्यावरून पर्यटकांची वाहने सातत्याने गेली तर तेथील रस्ताही खराब होऊ शकतो त्यामुळे वाहतूक पूर्ण ठप्प होऊन मोसे खोऱ्यातील दळणवळण बंद होऊ शकते , हा धोका लक्षात घेऊन तहसीलदारांनी लवासा प्रशासनाला पत्र देऊन पर्यटनाला बंदी घातली आहे.

तहसीलदारांनी लवासाला दिलेल्या आदेशात म्हटले आहे की , नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे दि. २५/०७/२०२४ रोजी घोटावडे कडुन लवासा सिटीकडे जाण्याचा मार्ग टेमघर गावाजवळ खचल्यामुळे सदरच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन तात्पुरत्या स्वरुपाचा कच्चा रस्ता तयार करणेत आलेला आहे. सदरचा रस्ता हा फक्त लवासा सिटीमधील कर्मचारी व लवासा सिटीच्या पलीकडील बाजूस असलेल्या गावातील नागरिकांसाठी तयार करण्यात आलेला असुन पर्यटकांसाठी केलेला नाही .

हा कच्चा तसेच तुटलेला रस्ता हा लवासा सिटीकडे जाण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकरिता वाहतुकीसाठी बंद करणेत आलेला होता. परंतु तहसील कार्यालयाच्या असे निदर्शनास आले आहे की, लवासा प्रशासना मार्फत लवासा सिटीमध्ये पर्यटनासाठी बुकींग सुरु केले असून सदर पर्यटक या कच्या व तुटलेल्या रस्त्यावरुन मोठया प्रमाणात ये-जा करीत आहे.

हा रस्ता कच्च्या स्वरुपाचा असून तात्पुरत्या वाहतुकीसाठी तयार केलेला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या वाहतुकीमुळे ये-जा करुन सदरचा कच्चा रस्ता खराब झाल्यास अथवा त्या रस्त्यास कोणतीही हानी पोहोचल्यास टेमघर धरणाच्या पलीकडील सर्व गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. तसेच या रस्त्यावरुन वाहतूक करतेवेळी अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे लवासा सिटीमध्ये सुरु असलेले पर्यटन पूर्णतः बंद करणेत यावे. लवासात पर्यटन सुरु राहिल्यास या रस्त्यावरुन वाहतुक होताना कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी लवासा प्रशासनावर निश्चित करणेत येईल व आपल्या विरुध्द योग्य ती फौजदारी कारवाई करण्यात येईल.

दरम्यान पौड पोलिसांनाही या आदेशाची प्रत देण्यात आली असून त्यात म्हटले आहे की , या रस्त्यावरुन पर्यटक वाहतुक तसेच ये जा करणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. याबाबत तहसीलदार रणजित भोसले म्हणाले , " तहसील कार्यालयाने २७ ऑगष्ट रोजी लवासा कॉर्पोरेशनच्या प्रशासनाला पत्र देऊन तेथील रस्ता पर्यटकांसाठी बंद करावा , अशा सूचना दिल्या होत्या. असे असूनही काल आणि परवा त्या रस्त्यावरून लवासात पर्यटक गेल्याने त्यांना पुन्हा आठवण म्हणून आज हे पत्र पुन्हा दिलेले आहे. त्यानुसार लवासातील पर्यटनाला आता पूर्ण बंदी केली आहे. त्यानंतरही जर लवासात काही घटना घडली तर लवासा प्रशासनावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत. "

पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोजकुमार यादव म्हणाले , " या संदर्भात लवासा प्रशासनास सक्त सूचित करण्यात आले असून पोलीस प्रशासन वेळोवेळी तपासणी करणार आहे."

लवासाचे प्रशासक मृत्यूंजय गोस्वामी म्हणाले , " आम्ही लवासातील पर्यटनाला पूर्ण बंदी केली असून सध्या लवासात पर्यटक येत नाहीत. टेमघर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या तात्पुरत्या तयार केलेल्या रस्त्यावर तपासणी नाके उभारले असून त्या ठिकाणी आठ ते नऊ "

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Disqualification Case: शिवसेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मिळाला मुहूर्त; या तारखेला होणार सुनावणी

Latest Marathi News Updates : स्थानिकांनी घातला धारावी पोलीस ठाण्याला घेराव

Cha.Sambhajinagar: मराठवाड्यात काँग्रेस असणार मोठा भाऊ? या जागांवर केला दावा

Tirumala Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये आढळले जनावराची चरबी अन् माशांचं तेल; 'या' पद्धतीने ओळखा तूपाची शुद्धता

Bigg Boss Marathi 5 Voting Trends: सुरजला जान्हवीने दिली टक्कर तर 'या सदस्याला मिळालेत सगळ्यात कमी वोट्स; कोण होणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT