pune leopard attack on 6 year old girl hospital doctor ambegaon  Sakal
पुणे

Pune Leopard Attack : बिबट्याचा हल्ल्यात ६ वर्षीय मुलगी जखमी

लग्नकार्य आटोपल्यानंतर पायवाटेने घरी परतत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने ६ वर्षीय मुलगीवर हल्ला केला.

सकाळ वृत्तसेवा

फुलवडे : आंबेगाव येथील बाळू मेमाणे आपल्या कुटुंबासमवेत लग्नासाठी नायफड ता. खेड येथे गेले होते. लग्नकार्य आटोपल्यानंतर पायवाटेने घरी परतत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांची मुलगी आराध्या बाळू मेमाणे (वय ६ वर्षे) हिच्यावर हल्ला केला.

मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या तिथून पळून गेला. जखमी झालेल्या मुलीला तातडीने तळेघर येथील आरोग्य केंद्रात आणले परंतु गंभीर जखम असल्याने तिला घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

याप्रसंगी तळेघरच्या वनपाल सुवर्णा जगताप व तेरुंगणचे वनरक्षक बी. डी. पटेकर यांचे सहकार्य लाभले. घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे यांनी रुग्णालयात जाऊन मुलीची विचारपूस केली.

खेड व आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात बिबट्यांच्या वावर वाढला असून यापूर्वी खेड तालुक्यातील पश्चिम भागात दोन घटना घडलेल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी टोकावडे ता. खेड भागात भर दिवसा रानात बिबट्याचे दर्शन झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या आदिवासी भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

वनविभागाने याबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा बिबट्याच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचे बळी जातील. याबाबत वनविभागाकडे विचारणा केली असता बिबट प्रवण क्षेत्रात गस्त वाढविण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT