Pune License ban if Excessive sale of chemical fertilizers sakal
पुणे

पुणे : खतांची जास्त भावाने विक्री केल्यास परवाना रद्द करणार- ज्ञानेश्‍वर बोटे

खरीप हंगामातील पिकांसाठी आवश्‍यक रासायनिक खतांची जास्त भावाने विक्री

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खरीप हंगामातील पिकांसाठी आवश्‍यक असलेल्या रासायनिक खतांची जाणीवपूर्वक कृत्रीम टंचाई निर्माण करून, या खतांची सरकारने निश्‍चित केलेल्या भावामध्ये जास्त भावाने विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील खते विक्रेत्यांनी जास्त दराने विक्री करू नये, अशी सूचना कृषी विभागाच्यावतीने सर्व विक्रेत्यांना देण्यात आली आहे. या सूचनेचे उल्लंघन करणाऱ्या खते विक्रेत्यांचा विक्री परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या करण्यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांची खरेदी करत असतात. खरिपातील पेरण्यांबरोबरच उसासाठीही रासायनिक खते खरेदी करावी लागत आहेत. यामुळे रासायनिक खतांची वाढती मागणी पाहता, काही विक्रेते हे अधिकाधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने खतांची कृत्रीम टंचाई निर्माण करून, जास्त दराने विक्री करू लागले असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे बोटे यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने १ एप्रिल २०२२ पासून युरिया, डीएपी. एमओपी, २०ः२०ः०ः१३, २४ः२४ः०ः८५, १९ः१९ः१९, १०ः२६ः२६, १२ः३२ः१६, १४ः३५ः१४, १४ः२८ः००, १५ः१५ः१५, १६ः२०ः००ः१३, १६ः१६ः१६, २८ः२८ः००, १५ः१५ः१५ः०९, १७ः१७ः१७, ०८ः२१ः२१ आणि ०९ः२४ः२४ आदी रासायनिक खतांच्या किमती नव्याने निश्‍चित केल्या आहेत.

विविध खतांच्या निश्‍चित किमती (प्रति बॅग, रुपयांत)

  • - युरिया --- २६६ रुपये ५० पैसे.

  • - डीएपी (एनएफएल वगळता) --- १ हजार ३५०.

  • - डीएपी (एनएफएल) --- १ हजार २००.

  • - एमओपी --- १ हजार ७००.

  • - एमओपी (एनएफएल) --- १ हजार १००.

  • - एमओपी (कोरोमंडल) --- १ हजार.

  • - २४ः२४ः०० --- १ हजार ९००.

  • - २४ः२४ः०ः८५ (कोरोमंडल) --- १ हजार ९००.

  • - २०ः२०ः०ः१३ --- किमान १ हजार १५० (कंपनीनिहाय वेगळा दर)

  • - १९ः१९ः१९ --- १ हजार ५७५.

  • - १०ः२६ः२६ --- १ हजार ४४०.

  • - १२ः२६ः२६ --- १ हजार ४५०.

  • - १४ः३५ः१४ --- १ हजार ९००.

  • - १४ः२८ः०० --- १ हजार ४९५.

  • - १५ः१५ः१५ --- १ हजार ५००.

  • - १६ः २०ः००ः१३ --- किमान १ हजार १२५ ते १ हजार ४००.

  • - १६ः१६ः१६ --- १ हजार ४७५.

  • - २८ः२८ः०० --- १ हजार ७०० ते १ हजार ९००.

  • - अमोनिअम सल्फेट --- १ हजार १००.

  • - १५ः१५ः१५ः०९ --- १ हजार ३७५ ते १ हजार ४५०.

  • - १७ः१७ः१७ --- १ हजार २१०.

  • - ०८ः२१ः२१ --- १ हजार ८५०.

  • - ०९ ः२४ः२४ --- १ हजार ९००.

येथे नोंदविता येणार तक्रार

जिल्ह्यातील कोणीही खत विक्रेता निश्‍चित किमतीपेक्षा जास्त दराने खताची विक्री करत असल्यास, त्याबाबतची तक्रार करण्यासाठी जिल्हास्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या कक्षाच्या ०२०- २५५३७७१८, २५५३८३१० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९१५८४७९३०६ व ९४२३८७४०६७ या मोबाईल क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. शिवाय dsaopune@gmail.com किंवा adozppune@gmail.com या इ-मेल आयडीवरही तक्रार नोंदविता येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT