Local sakal
पुणे

Ticket Checker : फुकट्या प्रवाशांची आता खैर नाही; ४० तिकीट पर्यवेक्षकांचे पथक करणार तपासणी

लोकल व डेमूमध्ये तिकीट न काढताच प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लोकल व डेमूमध्ये तिकीट न काढताच प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने लोकल, डेमूसारख्या गाड्यांमध्ये तिकीट पर्यवेक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. आता ४० तिकीट पर्यवेक्षक वेगवेगळ्या गाड्यांमधून फिरून प्रवाशांचे तिकीट तपासतील. ज्यांच्याकडे तिकीट नसेल, अशा फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज सुमारे २५० प्रवासी गाड्या धावतात. तिकीट पर्यवेक्षकांची संख्या कमी असल्याने अनेकदा गाड्यांमध्ये तिकीट पर्यवेक्षकांची नेमणूक केली जात नाही. याचाच फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने केवळ लोकल, डेमूमध्येच तिकीट पर्यवेक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे ते लोणावळा लोकलच्या रोज ४१ फेऱ्या होतात, तर पुणे ते दौंड दरम्यान धावणाऱ्या डेमू तसेच हडपसर ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजरमध्येही तिकीट पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. याशिवाय, स्कॉडची देखील करडी नजर राहणार आहे.

लोकल, डेमूसह पॅसेंजर गाड्यांमध्ये तिकीट पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. विनातिकीट प्रवास करताना प्रवासी आढळला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. तेव्हा प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा.

- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT