Pune Politics Esakal
पुणे

Pune Politics: कसब्यातील पराभवानंतर आता भाजप सावध खेळी, यावेळी बापट कुटुंबियांना संधी?

कसब्यानंतर भाजप सावध, पुन्हा एकदा जागा राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे 29 मार्च रोजी निधन झालं. त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक येत्या सहा महिन्यात पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वीच आता गिरीश बापट यांचा वारस कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी भाजपमधुन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होतील. या जागेसाठी भाजपमधून काही जणांची नावे चर्चेत आली आहे.

दरम्यान कसबा मतदार संघात झालेल्या मोठ्या पराभवानंतर भाजपची आता सावध भुमिका असणार आहे. गिरीश बापट यांच्या परिवारात उमेदवारी देण्यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत मोठा पराभव पचवावा लागला.

फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा मोठा पराभव झाला आहे. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भाजपचा ३० वर्षांपासूनचा हातातील गड गेला. या पराभवाची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली. यावर चर्चा देखील झाली. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली नसल्यामुळे पराभव झाल्याचा एक निष्कर्ष काढण्यात आला होता.

कसबा पेठेत उमेदवार निवडताना आमची चूक झाली असल्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी म्हंटले होते. म्हणजेच कसबाच्या पराभवातून भाजप धडा घेणार असल्याचे दिसुन यात आहे.

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून ५ नावांची चर्चा सुरू आहे. यामध्ये माजी खासदार संजय काकडे, मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे आणि जगदीश मुळीक यांची नावे चर्चेत आहेत. त्याचबरोबर बापट यांची सून स्वरदा बापट किंवा गिरीश बापट यांची पत्नी गिरिजा बापट यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

गिरीश बापट यांचा मुलगा गौरव यांना राजकारणात फारसा रस नाही. मात्र बापट यांची सुन स्वरदा यांना राजकारणाचा अनुभव आहे. त्या लग्नाच्या आधी सांगली मनपाच्या नगरसेविका होत्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देखील काम त्यांनी पाहीले आहे. गिरीश बापट यांच्या खासदारकीच्या निवडणुकीपासून त्या पुणे शहरातील राजकारणात सक्रीय आहेत.

भाजपकडून पुणे लोकसभा निवडणुकीत बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कसब्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप बापट यांच्या सूनेला तिकीट देण्याची दाट शक्यता आहे. स्वरदा बापट यांना तिकीट मिळाल्यानंतर काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार नसल्याची शक्यता आहे. मात्र, इतरांना उमेदवारी दिल्यास भाजपमधूनच नाराजीचा सूर पुन्हा एकदा उमटू शकतात.

अशातच मागील निवडणुकीवेळी ब्राम्हण समाजाचं नेतृत्व नसल्याची चर्चा सुरू झाली होती. कसब्यात जे झालं तेच पुन्हा लोकसभेला होऊ शकतं. त्यामुळे बापट यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न देणं भाजपला परवडणारं नसेल अशा स्वरुपाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मोहोळमध्ये राजू खरे 29528 मतांनी आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT