Pune Lok Sabha 2024 Esakal
पुणे

Pune Lok Sabha 2024: हॅट्‌ट्रिक होणार की चमत्कार? धंगेकर 'भाऊ' की मोहोळ 'अण्णा', पुण्यात कोण करणार हवा

Pune Lok Sabha 2024: पुणे मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आणि एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असल्याने महायुतीचे वर्चस्व असल्याने भाजपसाठी सोपी मानावी अशी लढाई आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune Lok Sabha 2024: पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपला विजयी हॅट्‌ट्रिक करण्याची संधी निर्माण झालेली आहे. या मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आणि एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असल्याने महायुतीचे वर्चस्व असल्याने भाजपसाठी सोपी मानावी अशी लढाई आहे. पण कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिल्याने कॉँग्रेसलाही विजयाचे स्वप्न पडू लागले आहे. काँग्रेसने सक्षम उमेदवार दिला व गटबाजी टाळून एकदिलाने काम केले तर या निवडणुकीत चमत्कारही घडू शकतो. ही लढाई भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यात असणार आहे.

२०१९ चे चित्र

गिरीश बापट (भाजप) विजयी मते : ६,३२,८३५

मोहन जोशी (काँग्रेस) मते : ३,०८,२०७

अनिल जाधव (वंचित) मते : ६४,७९३

नोटा मते : ११,००१

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : ३,२४,६२८

वर्चस्व

२००४ : काँग्रेस

२००९ : काँग्रेस

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

सद्य:स्थिती

भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर

विधानसभा मतदारसंघनिहाय भाजपच्या बैठका सुरू

‘मविआ’च्या जागावाटपाच्या चर्चेनंतर अखेर रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी

अंतर्गत गटबाजी रोखण्याचे भाजपसह काँग्रेसपुढे आव्हान

‘कसब्या’तील पुनरावृत्तीची काँग्रेसला अपेक्षा; तर भाजपची सावध भूमिका

हे मुद्दे प्रभावी ठरणार

संथ गतीने होणारा मेट्रोचा विस्तार

पुरंदरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ हवेतच आहे. निवडणुकांमध्ये केवळ चर्चा

शहरात अपुऱ्या पायाभूत सुविधा

पाणी पुरवठा, पर्यावरणाचा मुद्दा ऐरणीवर

मराठा, मुस्लिम, दलित, ओबीसी मतदारांची भूमिका ठरणार महत्त्वाची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT