Ravindra Dhangekar : पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवर रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. सहकार नगर पोलिस ठाण्यात त्यांनी रविवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत ठिय्या मांडलेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केलीय. त्याशिवाय धरणे आंदोलनातून उठणार नसल्याची भूमिका धंगेकरांनी घेतलीय.
या प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की, सहकारनगर पोलीस ठाण्यात पैसे वाटप झाल्याची तक्रार आहे. या तक्रारीची दखल आम्ही घेतली, पण या तक्रारीत काही पुरावे सापडले नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही.
पोलिस आयुक्त पुढे म्हणाले की, एक उमेदवार तिथे येऊन ते गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत आहेत. पण विनापुरवा कुठलाही गुन्हा दखल करता येत नाही. तिथे ते बसले आहेत आणि बेकायदेशीरपणाने जमाव केला आहे.
''भाजपचे एक शिष्टमंडळ आम्हाला भेटले आहे आणि आम्ही त्यांनादेखील समजावले आहे. संपूर्ण पुणे शहरात मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून कलम १४४ लागू केले आहे. नक्कीच जे बेकायदेशीर पणाने जमाव करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.'' असं पोलिस आयुक्तांनी सांगितलं.
याशिवाय कुठल्या ही अफवांवर विश्वास ठेऊ नका, मतदान केंद्रापासून १०० मीटरवर फोटोग्राफी, व्हिडिओ बंदी आहे.. असंही पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.
रवींद्र धंगेकर मात्र सहकार नगर पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडून बसलेले आहेत. भाजपचे पैशांचे ट्रक पुण्यात आले असून सर्रास पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.