Pune Mahavitaran msedcl hits farmers Cow dies after being shocked broken electric wires esakal
पुणे

Pune News : महावितरणच्या हलगर्जीपणाचा शेतकऱ्याला फटका; तुटलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागून गाय मृत्यूमुखी

नांदोशी येथील घटनेत शेतकरी थोडक्यात बचावला

निलेश बोरुडे

किरकटवाडी : महावितरणच्या हलगर्जीपणाचा सिंहगड रस्त्याजवळील नांदोशी गावातील शेतकऱ्याला फटका बसला असून तुटून पडलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागून गाय मृत्यूमुखी पडली आहे. सुदैवाने या घटनेत शेतकरी व इतर पाच गायींचे प्राण थोडक्यात वाचले आहेत मात्र गाभण गाय मेल्याने शेतकऱ्याचे सुमारे ऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

नांदोशी येथील शेतकरी श्रीराम कदम यांचा मुलगा सतीश कदम हा सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जणावरे चारण्यासाठी घेऊन चालला होता. वाटेत एका शेतामध्ये खांबावरील वीजेच्या तारा तुटून पडलेल्या होत्या व त्यामधून वीजप्रवाह सुरू होता.

पावसामुळे गवत वाढलेले असल्याने कदम यांना तारा दिसून आल्या नाहीत. अचानक एका गाईचा तारांना स्पर्श झाला व गाय जागेवर कोसळली. सतीश कदम यांनी प्रसंगावधान राखून इतर गाईंना तारांपासून दूर हाकलल्याने इतर पाच गाईंचे प्राण वाचले आहेत.

या ठिकाणी विजेच्या तारा झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या होत्या व अनेक दिवसांपासून शॉर्ट सर्किट होत होते. नांदोशीचा भाग महावितरणच्या ग्रामीण विभागांतर्गत येत असल्याने याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांनी वेळीच झाडांच्या फांद्या न तोडल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या खानापूर उपविभागाचे सहाय्यक अभियंता निशांत जनबोधकर घटनास्थळी दाखल झाले होते.

" गाभन गाय मेली असून सुमारे ऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. धोकादायक ठिकाणी महावितरणने वेळीच लक्ष देऊन काम करुन घेणे आवश्यक आहे. संबंधित कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी."

- श्रीराम कदम, शेतकरी नांदोशी.

"घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. वीजप्रवाह बंद करून तुटलेल्या तारा जोडून घेण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळेल."

- निशांत जनबोधकर, सहाय्यक अभियंता, महावितरण खानापूर उपविभाग,पुणे ग्रामीण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT