पुणे

वर्चस्वासाठी ‘भाईं’चं ‘काय पण’

पांडुरंग सरोदे ः सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोणाची दुचाकी, तर कोणाची रिक्षा, छोटा टेम्पो, प्रवासी मोटार या गाड्यांच्या चाकांवरच त्यांच्या आयुष्याला गती मिळते, त्याच्यावरच प्रत्येकाच्या कुटुंबकबिल्याचा उदरनिर्वाह अवलंबून आहे; पण एका रात्री पाच-सहा जणांचे टोळके येते. तलवारी, कोयते, लाकडी व लोखंडी दांडके घेऊन, गुंडांकडून रस्त्यावर लावलेल्या कष्टकऱ्यांच्या वाहनांची सरसकट तोडफोड, जाळपोळ केली जाते. नंतर दहशत निर्माण करून ते निघून जातात. पण आता तुटलेल्या, फुटलेल्या गाड्या घेऊन कामाला कसे जायचे, नुकसान भरून कसे काढायचे, असा प्रश्‍न मनात ठेवत सर्वसामान्य माणूस पोलिसांकडून न्याय मिळेल, या आशेने डोळे लावून बसतो. हे विदारक वास्तव आहे वस्त्या, चाळी, वाड्यांमध्ये राहणाऱ्या माणसांचे. अशा एक, दोन नव्हे तर तब्बल 49 वाहन तोडफोड, जाळपोळीच्या घटना शहरात घडल्या आहेत. 

मागील आठवड्यात मार्केट यार्ड येथे टोळक्‍याने 40 ते 45 वाहनांची तोडफोड केली तर तीन दिवसांपूर्वीच महमंदवाडीमध्ये टोळक्‍याने रस्त्यावर लावलेल्या आठ ते दहा वाहनांची तोडफोड केली. या घटना नुकत्याच घडलेल्या आहेत. गुंडांच्या दहशतीमुळे अशा घटनांबाबत नागरिकही बोलण्यास टाळतात. आवाज उठविणाऱ्यांना गुन्हेगार त्रास देतात, तर काही नागरिक स्वतःहून पोलिसांना माहिती देतात, तक्रारही करतात. मात्र त्यांच्यावर फुटकळ कारवाई केली जाते. काही दिवसानंतर तेच गुन्हेगार पुन्हा अशा घटना करतात.  

गेल्या वर्षी वाहन तोडफोडीच्या 49 घटना घडल्या. त्यामध्ये 158 आरोपींना अटक करण्यात आली आहे. बहुतांशवेळा अशा घटना झोपडपट्टी परिसरात घडतात. अशा घटनांची गांभीर्याने दखल घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर भर दिला जात आहे. अशा घटना करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कायद्यान्वये (एमपीडीए) गुन्हा दाखल करून परिणामकारक कारवाई करू. 
- बच्चन सिंह, पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा)

मी मार्केट यार्ड परिसरात राहतो. माझा एक छोटा टेम्पो असून मी मंडई, धान्य बाजारात टेम्पोत माल भरून ग्राहकांपर्यंत पोचवतो. बॅंकेतून कर्ज काढून टेम्पो घेतला आहे. पण टोळक्‍याने इतरांप्रमाणेच माझ्याही टेम्पोच्या काचा, टायर फोडले. गाडीचा हप्ता, घरखर्चाला पैसे जमवताना तारांबळ उडते. त्यात असा पाच-सहा हजारांचा खर्च कसा सोसणार? गुंड पोलिसांना जुमानत नाहीत, मग न्याय मागायचा तरी कोणाकडे?
- कैलास वाघमोडे, टेम्पोचालक 

पोलिसांकडील उपाययोजना 
    रस्त्यांवर पोलिसांचा वावर वाढविणे 
    बीट मार्शल गस्तीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करणे 
    गुन्हेगारांविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई 
    गुन्हेगारांची दैनंदिन तपासणी व पुन्हा गुन्हे करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे

वर्ष     दाखल गुन्हे     अटक केलेले             आरोपी 
2018     39     139 
2019     29     93 
2020     49     158 

गरज कठोर कारवाईची 
याप्रकरणी पोलिस आरोपींविरुद्ध 159 कलमान्वये बेकायदार जमाव जमवून शस्त्रासहित वाहनांची तोडफोड, जाळपोळ करणे, अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करतात. परंतु काही दिवसांतच संबंधित आरोपी सुटून पुन्हा तेच प्रकार करतात. वारजे पोलिसांनी मागील वर्षी अशा गुन्हेगारांविरुद्ध सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणल्याच्या कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे अशा प्रकारची ठोस कारवाई पोलिसांनी करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT