Pune Mastani lake - पाटस (ता. दौंड) येथील ऐतिहासिक मस्तानी तलावाचे भविष्यात जैवविविधतेने नटलेले वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. हा तलाव पक्ष्यांच्या अधिवासाचे हक्काचे ठिकाण बनणार असून, पक्षिप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनीता सिंग यांनी या तलावाच्या सुशोभीकरणासाठी ठोस पावले उचलली आहेत. या ठिकाणी पक्ष्यांसाठी आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी वेगवेगळ्या जातीचे फळ व फुलझाडे, इतर झाडांचे रोपण केले आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता मोठी आहे. तलावासह परिसरात प्रादेशिक वनविभागाचे मोठे क्षेत्र आहे. त्यापैकी काही हेक्टर क्षेत्रावर सामाजिक वनीकरणाच्या वतीने जैव विविधतेसाठी उपक्रम राबविला जाणार आहे, त्यादृष्टीने डॉ. सिंग यांनी नियोजन केले आहे.
सुशोभीकरणाचा हेतू...
तलाव परिसरात वेगवेगळ्या पक्ष्यांचे मोठ्या संख्येने आगमन होऊन त्यांचा अधिवास तयार व्हावा, शिवाय झाडांमुळे या ठिकाणी पर्जन्यमान चांगले व्हावे, या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जातींच्या सहा हजार झाडांच्या वृक्षारोपणाचे उद्दिष्ट आहे.
तलावाची स्थिती...
प्रादेशिक वनविभागाने सन २०१९ मध्ये हा तलाव व परिसर ताब्यात घेतला आहे. या तलावामध्ये व परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली होती. तलावाच्या परिसरात ठिकठिकाणी घाण पसरली आहे.
पक्षिप्रेमी आनंदित...
सध्या सामाजिक वनीकरणाने या तलाव परिसरात वृक्षलागवड आणि पक्ष्यांच्या अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दरम्यान, हा उपक्रम यशस्वी झाल्यास भविष्यात या तलावाची वेगळी ओळख निर्माण होण्यास मदत होईल. शिवाय हा तलाव लोकांना भुरळ घालणार हे नक्की, असे मत पक्षिप्रेमीं व्यक्त करीत आहेत.
मस्तानी तलाव क्षेत्रफळ
२४.८२ हेक्टर
पाणी साठवण क्षमता
१४ हेक्टर अंदाजे
वृक्षारोपण पहिला टप्पा
वडाच्या रोपांची लागवड
उद्दिष्ट
६००० रोप लागवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.