Murlidhar_Mohol 
पुणे

Breaking : गणेशोत्सवाबद्दल पुणे महापौरांनी घेतला महत्त्वाचा निर्णय; वाचा सविस्तर!

सकाळ वृत्तसेवा

Ganesh Festival 2020: पुणे : यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्राणप्रतिष्ठापनेची आणि विसर्जन मिरवणूक काढू नये. तसेच मंडळांनी मंडपाच्या ठिकाणीच मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी (ता.२२) केले. तर यावर्षी नवीन कोणत्याही मंडळांना परवाना न देण्याचा, तसेच गेल्या वर्षीच्या परवान्यावर मंडळांना मंडपाची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

देशाचे वैभव असलेल्या आणि पुण्यनगरीच्या वैभवशाली गणेशोत्सवाला पुढील महिन्यात सुरवात होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी महापौर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह महापालिकेतील सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित होते. बैठकीनंतर महापौर मोहोळ आणि रासने यांनी ही माहिती दिली.

रासने म्हणाले," यावर्षी नवीन कोणत्याही मंडळाला परवाना न देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तर मंडपासाठी मंडळांनी परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज न करता त्यांना गेल्या वर्षीच्या परवाना ग्राह्य धरून परवानगी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुढील वर्षी तोच परवाना ग्राह्य धरून परवानगी देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महापौर मोहोळ म्हणाले, "कोरोनाचे संकट पाहता मंडळांनी यंदा मंडपातच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे. दरवर्षी गणेश मूर्तींचे विसर्जन करणाऱ्या मंडळाने यंदा शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चार फूट उंचीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. तर नागरिकांनी देखील घरातील गणपतीचे विसर्जन घरीच करावे. गणपती विक्री स्टॉलधारकांना परवानगी देण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच त्याबाबतची नियमावली तयार करून ती जाहीर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.''

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीनही पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी; भाजप-धजद युतीला धक्का, माजी मुख्यमंत्र्यांचे दोन पुत्र पराभूत

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएलचा मेगा लिलाव आज! थोड्याच वेळात सौदी अरेबियात खेळाडूंवर बोली लागणार

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी भाजपकडे भीक मागितली, पण.... अब्दुल सत्तार यांचा खोचक टोला

IND vs AUS 1st Test : विराट कोहलीचे १६ महिन्यांनंतर कसोटीत शतक! भारताचे यजमानांसमोर ५३४ धावांचे तगडे लक्ष्य

Oath Ceremony: महायुतीच्या बैठकांचा धडाका, पुढील रणनिती आखण्यावर चर्चा, शपथविधीबाबत मोठी माहिती समोर!

SCROLL FOR NEXT