Pune Metro sakal
पुणे

Pune Metro आता चौफेर! दोन नव्या मार्गांना मंजुरी; जाणून घ्या कुठे कुठे धावणार?

New Route of Pune Metro: या दोन नव्या मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत आज मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळेपुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे.

आशुतोष मसगौंडे

Pune Metro new route details:

पुण्यात खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या दोन नव्या मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत आज मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळेपुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे.

दरम्यान पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे केद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय

  1. मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी.

  2. आगरी समाजासाठी महामंडळ समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

  3. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

  4. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

  5. वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

  6. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

  7. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

  8. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

  9. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

  10. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

  11. किल्लारीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्यास कर्ज परतफेड समान हप्त्यात करण्यास मान्यता

  12. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

  13. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

  14. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

  15. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

  16. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

  17. ‘उमेद’साठी अभ्यासगट

  18. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT