खडकवासला - पुणे मेट्रो टप्पा - २ मधील अतिशय महत्वाच्या मेट्रो रेल्वे मार्गीकेच्या कामाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. गेली काही वर्षे मेट्रोच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पासाठी सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पाठपुराव्याला यश आले. अशी प्रतिक्रिया आमदार भीमराव तापकीर यांनी दिली.
खडकवासला, स्वारगेट, हडपसर ते खराडी, एसएनडीटी ते वारजे माणिकबाग आणि स्वारगेट ते कात्रज यासाठी पाठपुरावा केला. आजच्या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली होती. वरील प्रस्तावित मेट्रोच्या मार्गाची पाहणी मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांच्या समवेत चार डिसेंबर २०२४ रोजी केली होती.
खडकवासला, स्वारगेट, हडपसर ते खराडी
या मार्गावर कोल्हेवाडी फाटा (सीडब्ल्यूपीआरएस) संस्था, दळवीवाडी, नांदेड सिटी प्रवेशद्वार, धायरी फाटा, फन टाईम थिएटर, माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम पूल, पु.ल. देशपांडे उद्यान, दांडेकर पूल मार्गे स्वारगेट नॉर्थ, सेवन लव्ह चौक, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, रेस कोर्स, फातिमानगर, रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा साउथ, मगरपट्टा मेन, मगरपट्टा नॉर्थ, हडपसर रेल्वे स्टेशन, साईनाथ नगर व खराडी चौक असे थांबे असणार आहेत.
जोड लाईन
एसएनडीटी ते वारजे माणिकबाग या जोड लाईनला आजच्या बैठकीत देखील मान्यता दिली आहे. यामध्ये दौलतनगर(माणिकबाग), वारजे, कर्वेनगर, डहाणूकर कॉलनी, कर्वे पुतळा, पौड फाटा, एसएनडीटी(नळ स्टोप') असा मार्ग आहे.
स्वारगेट ते कात्रज -
पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गिकेसाठी पाठपुरावा केला. या मार्गामुळे गुलटेकडी, मार्केट यार्ड, पद्मावती, बिबवेवाडी, धनकवडी, बालाजीनगर, कात्रज, यासह बालाजीनगरचा थांबा करण्याच्या मागणी केली होती. टी देखील मजूर झाली आहे. दरम्यान एसएनडीटी ते वारजे येथून वारजे गावठाण, शिवणे- उत्तमनगर, कोंढवे धावडे परिसरात याचा विस्तार करावा. अशी ही मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.