MHADA home sakal
पुणे

Mhada Home : म्हाडाच्या ४ हजार २२२ सदनिकांसाठी सोडत शुक्रवारी

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) अंतर्गत एकूण ४ हजार २२२ नवीन सदनिकांसाठी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमध्ये शुक्रवारी (ता. ७) सकाळी दहा वाजता ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) अंतर्गत एकूण ४ हजार २२२ नवीन सदनिकांसाठी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमध्ये शुक्रवारी (ता. ७) सकाळी दहा वाजता ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे.

पुणे - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) (MHADA) अंतर्गत २ हजार ८२३ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एक हजार ३९९ सदनिका (Flats) अशा एकूण ४ हजार २२२ नवीन सदनिकांसाठी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमध्ये शुक्रवारी (ता. ७) सकाळी दहा वाजता ऑनलाइन सोडत (Online Draw) काढण्यात येणार आहे.

म्हाडाच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ १६ नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता. या चार हजार २२२ सदनिकांसाठी ८० हजार ८४८ अर्जदारांनी अर्ज नोंदणी केली आहे. त्यापैकी ६५ हजार १८० अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सोडतीमध्ये सहभाग नोंदविला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनामध्ये व्हिडिओ कॉन्फरसद्वारे ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

सदनिकांच्या ऑनलाइन सोडतीच्याचा कार्यक्रम महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, पुणे खंडपीठाचे न्यायिक सदस्य एम.एम.पोतदार, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा परिषदेत केवळ ५० नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सर्व अर्जदारांना फेसबुक लाइव्ह व युटूब लाइव्हची लिंक पाठवण्यात येणार असून, लिंकच्या माध्यमातून ऑनलाइन सोडतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT