monsoon sakal
पुणे

Monsoon : मॉन्सूनची प्रगतीसाठी पोषक स्थिती

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गेल्या आठवडाभरापासून ‘जैसे थे’च्या स्थितीत असून मॉन्सूनची वाटचाल मंदावली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गेल्या आठवडाभरापासून ‘जैसे थे’च्या स्थितीत असून मॉन्सूनची वाटचाल मंदावली होती. अरबी समुद्रात निर्मिती झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मॉन्सूनच्या प्रगतीवर ही परिणाम झाला होता.

मात्र आता पुन्हा मॉन्सूनच्या पुढील प्रवासाला सुरवात झाली असून सोमवारी (ता. १९) मॉन्सूनने आंध्र प्रदेश व कर्नाटकाच्या आणखीन काही भागात मजल मारली आहे. तसेच पूर्व भारताच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे. तर पुढील दोन दिवस मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक स्थिती असल्याचे हवामानशास्त्र विभागाने वर्तविले आहे.

मॉन्सूनच्या आगमनाला या वर्षी विलंब झाला असून त्यानंतर मॉन्सूनच्या प्रगतीमध्ये चढ-उताराची स्थिती पाहायला मिळत आहे. केरळात उशिराने दाखल झाल्यानंतर हळूहळू प्रवास करत मॉन्सूनने राज्याच्या तळ कोकणात व दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात ११ जून रोजी प्रवेश केला. त्यानंतर ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाने दिशा बदलल्यामुळे मॉन्सूनच्या वाटचालीस ही अडथळे येऊ लागले.

दरम्यान हे चक्रीवादळ निवळले असून आता पुन्हा एकदा मॉन्सूनच्या प्रगतीला सुरवात झाली आहे. त्यानुसार आता मॉन्सूनची प्रगती पूर्व भारतातील बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल या राज्यांच्या काही भागात झाली आहे. सध्या मॉन्सूनच्या प्रगतीची सीमा दक्षिण रत्नागिरी ते कावलीपर्यंत तसेच पूर्व भारतात कॉनिंग, शांतिनिकेतन व दुमकापर्यंत आहे. यातच आता पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने मॉन्सून येत्या दोन दिवसात दक्षिण द्वीपकल्प, बिहार, झारखंड आणि पश्‍चिम बंगालच्या आणखीन काही भागांमध्ये प्रगती करण्याची शक्यता आहे.

सद्य स्थिती -

- राज्याच्या कही भागांमध्ये ढगाळ वातावरणाची स्थिती

- ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ निवळले

- निवळलेल्या चक्रीवादळाच्या प्रणालीच्या प्रभावामुळे सध्या ईशान्य राजस्थान व लगतच्या परिसरावर कमी दाब क्षेत्राची स्थिती सक्रिय

- दक्षिण द्वीकल्पाचा काही भाग व उत्तरेकडील राज्यांच्या काही भागात मॉन्सून प्रगतीसाठी पोषक वातावरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

Late Sleeping Side Effects : रात्री १२ नंतर झोपत असाल तर सावध व्हा, वेळीच सवय बदला नाहीतर महागात पडेल!

Fact Check : वायनाड रोड शो मधील राहुल गांधींच्या T-Shirt वरील "I love Nafrat ki Dukan" स्लोगन खोटा, जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य

SCROLL FOR NEXT