Sanjay Rajiv Abhijit Sakal
पुणे

साठीपार तरुणांची यशस्वी गंगोत्री मोहीम!

मनात विश्र्वास आणि जिद्द असेल तर कोणतेही काम पूर्ण करणे अवघड नाही, अशी शिकवण नेहमी दिली जाते; मात्र याचे एक जिवंत उदाहरण म्हणजेच वयाची साठी ओलांडलेल्या अवलियांनी यशस्वीपणे पूर्ण केलेली गंगोत्री मोहीम.

सकाळ वृत्तसेवा

मनात विश्र्वास आणि जिद्द असेल तर कोणतेही काम पूर्ण करणे अवघड नाही, अशी शिकवण नेहमी दिली जाते; मात्र याचे एक जिवंत उदाहरण म्हणजेच वयाची साठी ओलांडलेल्या अवलियांनी यशस्वीपणे पूर्ण केलेली गंगोत्री मोहीम.

पुणे - मनात विश्र्वास आणि जिद्द असेल तर कोणतेही काम पूर्ण करणे अवघड नाही, अशी शिकवण नेहमी दिली जाते; मात्र याचे एक जिवंत उदाहरण म्हणजेच वयाची साठी ओलांडलेल्या अवलियांनी यशस्वीपणे पूर्ण केलेली गंगोत्री मोहीम. अत्यंत खराब हवामान, कोसळणाऱ्या दरडी आणि हिमवादळांचा सामना करून ही मोहीम यशस्वी करत पुण्यातील गिर्यारोहकांनी तरुणांना प्रेरणा देणारी कामगिरी केली आहे.

येथील ६८ वर्षांचे राजीव बाहेती, ६० वर्षांचे संजय जांडीआल आणि त्यांच्यासोबत ४६ वर्षांचे अभिजित चंद्रकांत उभे यांनी नुकतेच उत्तराखंडमधील गंगोत्री विभागातील गंगोत्री हिमनदी आणि शिवलिंग (ब) अशी सुमारे १८००० फूट उंच शिखराची मोहीम पूर्ण केली. या मोहिमेचे नेतृत्व जांडीआल यांनी केले. गंगोत्री हिमनदीचा अभ्यास आणि शिखर चढाई असा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. बहेती, जांडीआल आणि उभे यांनी आतापर्यंत दोन हजार फूट उंचीचे ५ शिखरे आणि गंगोत्री हिमनदीच्या निरनिराळ्या उपहिमनदीवर १९ हजार फूट उंचीपर्यंत १० ते १५ मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. या मोहिमेबाबत बाहेती यांनी सांगितले, ‘‘या पूर्वी १९९४ मध्ये ही मोहीम पूर्ण केली होती. यंदा २४ सप्टेंबरला गंगोत्री मोहिमेला सुरवात केली. यामध्ये शिवलिंग (ब) पर्यंतची शिखर चढाई आम्ही केली. त्यानंतर मुख्य शिवलिंग शिखराची चढाई अभिजितने पूर्ण केली. या मोहिमेदरम्यान खबरदारी व शिखर चढाईसाठी उपयुक्त सर्व साधने बाळगण्यात आली होती.’

मोहिमेच्या माध्यमातून या परिसरातील वनस्पती, प्राणी तसेच हिमनग वितळणे अशा सर्व विषयांचा अभ्यास देखील करण्यात येत आहे. यासाठी १९९४ ते २०२२ या कालावधित गंगोत्रीच्या या परिसरातील जैवविविधता आणि परिसंस्था कशा प्रकारे बदलत आहे याची निरिक्षणे केली. त्यासाठी १९९४ मध्ये काढलेले काही छायाचित्रांच्या आधारावर तुलना करण्यात आली. अभ्यासाकरिता गोळा करण्यात आलेली माहिती, डेटा आणि छायाचित्रे यांचा वापर केला जाता आहे. तर हिमनदीच्या अभ्यासासाठी डॉ. प्रदिप जाधव आणि टोकियो विद्यापीठाचे भूशास्त्र विभागप्रमुख डॉ. वेंकट अय्यंगार मार्गदर्शन करत असल्याचे बहेती यांनी सांगितले.

आव्हानांचा सामना

मोहिमेदरम्यान या गिर्यारोहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिखर चढाई व उतरताना गुडघ्याइतक्या बर्फातून, हिमखाईतून हा प्रवास झाला. अनेकदा बर्फवृष्टी होत असताना मोहिमेला ‘ब्रेक’ द्यावा लागत होता. तर जोरदार वाऱ्यांच्या प्रवाह सुरू असताना शिखर चढाई सुरू ठेवत होतो. हवामानात होणारा बदल, प्रतिकूल परिस्थिती त्यात हिमवादळ अशा अनेक नैसर्गिक अडथळ्यांना तोंड देत उत्साहाने मोहीम पूर्ण करत शिखरावर तिरंगा फडकविण्यात आला, असे जांडीआल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT