MP Of British sakal
पुणे

Pune:परदेशी विद्यापीठांना परवानगी स्वागतार्ह

ब्रिटनच्या खासदारांचे मत; शिष्टमंडळाचा पुणे दौरा

सम्राट कदम

पुणे- भारताने परदेशी विद्यापीठांना परवानगी द्यावी, म्हणून आम्ही वाट पाहत होतो. अखेरीस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे ही अडचण दूर झाली असून, या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे मत ब्रीटनचे खासदार लॉर्ड करण बिलीमोरी यांनी व्यक्त केले.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजच्या ‘इंडिया-युके फोरम ऑफ पार्लमेंटेरीयन’च्या माध्यमातून नऊ खासदारांचे एक शिष्टमंडळ पुणे भेटीवर आले आहे. त्यांनी लवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना लॉर्ड बिलिमोरी यांनी हे मत व्यक्त केले.

दुबईमध्ये इंग्लंडने विद्यापीठ संकुल सुरू केल्याचा दाखला बिलिमोरी यांनी दिला. भारतातही विविध विद्यापीठांशी शैक्षणिक करार करण्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. मात्र, ठोस अशा धोरणा संदर्भात त्यांनी भाष्य करणे टाळले.

कार्यक्रमाला सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते यावेळी उपस्थित होत्या. व्यापार, हवामान, स्वच्छ ऊर्जा, आरोग्य आणि सुरक्षा संबंध सुधारण्यासाठी या शिष्टमंडळाचा दौरा होता. आर्थिक संबंधांपासून नवीन शैक्षणिक धोरणाती बदलांपर्यंत विविध गोष्टींवर शिष्टमंडळाने चर्चा केली.

शिष्टमंडळात बिलीमोरी यांच्यासोबतच लॉर्ड कुलदीप सहोता, व्हिस्काउंट वेव्हरली, मार्टिन डे, डेम निया ग्रिफिथ, बॅरोनेस वर्मा, बॉब ब्लॅकमन, अँड्र्यू रोसिंडेल, लॉर्ड राज पॉल लूम्बा यांचा समावेश होता. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियालाही या शिष्टमंडळाने भेट दिली.

परदेशी विद्यापीठांनी छोटे संकुल उभारावे

नवीन शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना भारतात संकुल उभारण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, जमिनीच्या खरेदीपासून संपुर्ण संकुल उभारण्यासाठी अनेक परवाणग्यांची गरज पडते.

सिंबायोसिससारख्या विद्यापीठांकडे ही सुविधा पुरविण्याची क्षमता असून, परदेशी विद्यापीठांनी आमच्याकडे छोटी संकुले उभारावीत, असे आवाहन प्रा. शां.ब. मुजुमदार यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT