मुळशी : हॉस्पिटलमध्ये रुग्णासाठी वापरण्यात येणारी ब्लड शूगर, ब्लड प्रेशर आणि भुलीची औषध पत्नीला जबरदस्तीनं देऊन तिचा खून करण्यात आल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. एका खासगी हॉस्पिटलमध्ये परिचारक म्हणून काम करणाऱ्या २३ वर्षीय तरुणानं हे कृत्य केलं आहे. विशेष म्हणजे मृत्यू पावलेली त्याची पत्नी २२ वर्षांची आहे. (Pune Mulsi Crime Murder of wife by injecting BP sugar pills and ansthesia)
पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असणाऱ्या कासार आंबोली गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. स्वप्निल बिभिषण सावंत (वय २३) असं आरोपीचं नाव असून पौड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रियांका क्षेत्रे (वय २२) असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. स्वप्नीलचं त्याच्या रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते, त्यातूनच त्यानं पत्नीचा काटा काढायचं ठरवलं.
दुसरं लग्न करता यावं यासाठी त्यानं पत्नी प्रियांका क्षेत्रे हिला जीवे मारण्याचा कट रचला. यासाठी तो काम करत असलेल्या हॉस्पिटलमधून घातक औषधे गपचूप चोरून घरी नेत असे. ती औषध पत्नीला देण्यासाठी तो तिला डोकेदुखीवरचं औषध म्हणून ब्लड शुगर लेव्हल कमी व्हायच्या तसेच ब्लड प्रेशर कमी होण्याच्या गोळ्या देत होता. तसेच भुलीच्या इंजेक्शनचाही त्यानं पत्नीवर वापर केला.
ही सगळी औषध एकत्रितपणे जबरदस्तीनं दिल्यानं प्रियांका हीची प्रकृती बिघडली आणि अखेर तिचा मृत्यू झाला. पत्नीचा अशा प्रकारे थंड डोक्यानं खून केल्यानंतर कोणाला आपल्यावर संशय येऊ नये म्हणून स्वप्नीलनं पत्नीनं आत्महत्या केली असल्याचं दाखवण्यासाठी एक बनावट सुसाईड नोटही लिहून ठेवली. मात्र, पोलिसांना पतीवरच संशय आल्यानं त्याला पोलीशी खाक्या दाखवताच त्यानेच हा खून केल्याची कबुली दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.