corona updates sakal
पुणे

Pune : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी महापालिका सतर्क

महापालिकेच्या दवाखान्यांमधील आरोग्य सुविधा, आॅक्सिजन प्लांट याच्या सुसज्जतेसाठी आढावा घेण्यास सुरवात केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या नवीन व्हेरियंट धोकादायक असल्याने त्याला वेळीच रोखण्यासाठी पुणे महापालिकेच्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. शहरात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यासह महापालिकेच्या दवाखान्यांमधील आरोग्य सुविधा, आॅक्सिजन प्लांट याच्या सुसज्जतेसाठी आढावा घेण्यास सुरवात केली आहे.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये पुण्याला मोठा फटका बसला होता. विशेषतः दुसऱ्या लाटेत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे आव्हान निर्माण झाले होते. शहरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध नव्हते. आयसीयू, व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी नागरिकांना शहरभर फिरावे लागले होते. तर रुग्णसंख्या खूपच वाढल्याने रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाही मिळत नव्हती. रोज १००-१५० पेक्षा जास्त नागरिकांचा बळी जात असल्याने स्मशानभूमीवर देखील ताण निर्माण झाला होता. मार्च ते मे या तीन महिन्यात अचानक रुग्ण वाढल्याने प्रशासकीय यंत्रणेवर ताण आला होता. सध्या शहरातील कोरोनाची साथ नियंत्रणात आहे. रोजची रुग्णसंख्या १००च्या आत आली असून, गंभीर रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे, त्यामुळे महापालिकेने जम्बो रुग्णालयासह इतर रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सक्रिय झाला आहे. त्याचा प्रसार भारतात होऊ नये यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारकडून नवे निर्बंध आणले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नव्या व्हेरियंटमुळे कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याला तोंड देण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. आॅक्सिजन प्लांट, रुग्णालयातील व्यवस्था यापूर्वीच तयारी करून ठेवील आहे. पण ही सर्व यंत्रणा सध्या वापरात नसल्याने तिला पुन्हा कार्यान्वित करावी लागणार आहे. त्यासाठी चाचपणी सुरू केली जाणार आहे.

‘‘सध्याच्या नियमानुसार विमान प्रवास करून पुण्यात येणाऱ्या नागरिकाचे दोन डोस झाले नसतील तर आपण त्यांना कोरोनाची चाचणी बंधनकारक केलेली आहे. परदेशात आलेल्या नव्या व्हेरिंटयबद्दल अद्याप शासनाकडून सूचना आलेल्या नाहीत. ज्या सुधारित सूचना येतील त्याचे काटेकोर पालन केले जाईल. त्याच प्रमाणे महापालिका याबाबत सतर्क असून, शहरातील रुग्णालय, आयसीयू, व्हेंटिलेटर याचा आढावा घेतला जाईल. पालिकेच्या दवाखाण्यात सर्व यंत्रणा तपासली जाईल. शहरात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. त्यासाठी नागरिकांनीही नियमांचे पालन करावे.’’

- डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT