NCP Sakal
पुणे

पुणे : अनुकूल प्रभाग दिसताच राष्ट्रवादीची स्वबळाची भाषा

पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकूल असल्याचे दिसताच राष्ट्रवादीने थेट स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकूल असल्याचे दिसताच राष्ट्रवादीने थेट स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले.

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी (Pune Municipal Election) प्रारूप प्रभाग रचना (Ward Structure) राष्ट्रवादी काँग्रेससाठी (NCP) अनुकूल असल्याचे दिसत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून आघाडीची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीने आता थेट स्वबळावर (Independent) लढणार असल्याचे स्पष्ट केल्याने महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) तणाव निर्माण झाला आहे.

दरम्यान, प्रभाग रचनेचे स्वागत करताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यंदाच्या निवडणुकीत १२२ नगरसेवक निवडून येतील असा दावा यांनी पत्रकार परिषदेत केला.

जगताप म्हणाले, निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे व नियमानुसार प्रभाग रचना तयार केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला १२२ जागा मिळतील. ही प्रभाग रचना राष्ट्रवादीसाठी पूरक असल्याने ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी माझी इच्छा आहे. यासाठी पुढील तीन दिवसात शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. मात्र, महापालिका निवडणुकीत आघाडी करायची की नाही याचा अंतिम निर्णय पक्षाचे नेते घेतली. आघाडीसाठी शिवसेनेसोबत चर्चा झाली असली तरी ती प्राथमिक आहे, त्यात कोणताही निर्णय झालेला नाही. भविष्यात आघाडी झालीच तर राष्ट्रवादी काँग्रेस १७३ पैकी ११० जागांच्या खाली येणार नाही. भाजपसह इतर पक्षातील १६ नगरसेवक राष्ट्रवादीत येणार आहेत, असेही जगताप यांनी सांगितले.

आम्हाला काही फरक पडत नाही - शिवसेना

महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीनेच आम्हाला दोन वेळा बैठकीला बोलविले होते. पण त्यांना आता आघाडी करायची नसले तर आम्हाला काही फरक पडत नाही. सर्व जागा ताकदीने लढण्याची आमची तयारी आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळाल्याने प्रशांत जगताप यांची भूमिका बदलली असेल, पण आम्ही आघाडी करताना आम्ही कायम सतर्कच आहोत, असे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितले.

आमची तर स्वबळाची तयारी - काँग्रेस

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे आज स्वबळाची भाषा करत आहेत. पण आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच काँग्रेस स्वबळावर लढणार असे सांगितल्याने तीन महिन्यांपासून आमची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीने आघाडीसाठी आमच्याकडे संपर्क साधला होता, पण त्याचवेळी आम्ही तुमच्यासोबत येऊ शकणार नाही, असे त्यांना स्पष्ट केले होते. असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.

भाजपला शंभर जागा जिंकण्याचा विश्‍वास

निवडणूक आयोगाच्या नव्या प्रभाग रचनेनसुर भाजप १०० पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा एकदा महापालिकेत सत्ता मिळवेल असा विश्‍वास शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला. संघटनात्मक बांधणी, गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर आणि सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले महाविकास आघाडीचे राज्य सरकार यामुळे भाजपचा विजय सोपा आहे, असेही मुळीक यांनी सांगितले. तर सभागृहनेते गणेश बीडकर म्हणाले, मेट्रो, नदी सुधार प्रकल्प, कोरोना काळातील कामे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा यासह इतर कामांच्या जोरावर आम्ही आगामी निवडणूक जिंकू, शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT