Pune municipal corporation election sakal
पुणे

पुणे महापालिकेसाठी ओबीसी आरक्षणाची सोडत उद्या, दिग्गजांना बसणार धक्का

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी उद्या (ता. २९) सोडत काढली जाणार आहे.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी उद्या (ता. २९) सोडत काढली जाणार आहे.

पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी उद्या (ता. २९) सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील निवडणुकीचे चित्र बदलणार असले तरी आरक्षणाच्या नियमामुळे सहा ते सात प्रभागातील दिग्गज व अनुभवी नगरसेवकांनाच पत्ता कट होण्याची शक्यता या निर्माण झाली आहे. त्यामुळे नेमके यात काय होणार याची उत्सुकता लागली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी अ, ब, क असे तीन सदस्य संख्येचे ५७ तर दोन सदस्य संख्येचा एक असे एकूण ५८ प्रभागातून १७३ नगरसेवक निवडले जाणार आहेत. यापूर्वी ओबीसी आरक्षणाशिवाय निघालेल्या सोडतीमध्ये २३ जागा अनुसूचित जाती व दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेल्या आहेत. आता उर्वरित १४८ जागांमधून ओबीसी प्रवर्गाच्या ४६ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ५१ जागांवर आरक्षण काढण्यासाठी सोडत काढली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या १५ डिसेंबर २०२१ रोजी काढलेल्या राजपत्राचा आधार घेतला जाणार आहे.

अशा प्रकारे काढली जाणार सोडत

- एकूण ५८ प्रभागांपैकी २४ प्रभागांमध्ये अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण आहे. त्यामुळे उर्वरित ३४ प्रभागातील ‘अ’ जागा ओबीसी सर्वसाधारण गटासाठी आरक्षित केली जाईल.

- ओबीसीच्या ४६ पैकी उर्वरित १२ जागा या अनुसूचित जाती व जमातीचे सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण आहे अशा प्रभागातील 'ब' जागेवर सोडत काढली जाईल.

- अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण असलेल्या प्रभागात ‘ब’ जागा ओबीसीसाठी आरक्षित केली जाईल.

- जर संबंधित प्रभागात अनुसूचित जाती किंवा जमातीचे सर्वसाधारण गटाचे आरक्षण असेल तर अशा प्रभागात 'ब' जागा आपोआप ओबीसी महिलांसाठी आरक्षित होईल. तर ‘अ’ जागा अनुसूचित जाती किंवा जमातीच्या महिलांसाठी आरक्षित असेल तर तेथील ‘ब’ जागा ओबीसी सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होईल.

- यामध्ये जेवढ्या जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित होतील तेवढ्या वजा करून उर्वरित ओबीसी महिलांचे आरक्षण करण्यासाठी ३४ प्रभागातील जागेवर सोडत काढली जाईल.

- अशाप्रकारे ओबीसीच्या ४६ पैकी २३ जागा सर्वसाधारण गटासाठी व २३ जागा महिलांसाठी आरक्षित केल्या जातील.

- ओबीसीच्या आरक्षणाची प्रक्रिया संपल्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण काढले जाईल.

- एकूण ५८ पैकी ज्या २२ प्रभागात कोणत्याही प्रवर्गातील महिलांसाठी जागा आरक्षित नाही, अशा प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी एक जागा थेट दिली जाईल.

- त्यानंतर ज्या प्रभागात तीन पैकी दोन जागांवर कोणतेही आरक्षण पडलेले नाही अशा प्रभागातील ‘ब’ जागेवर सर्वसाधारण महिलेचे आरक्षण निश्चित केले जाईल. अशा २२ ते २३ जागा आरक्षीत होतील.

- ५१ पैकी उर्वरित सहा ते सात सर्वसाधारण गटातील महिलांचे आरक्षण काढण्यासाठी ज्या १२ प्रभागात अनुसूचित जाती किंवा जमातीच्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षीत असलेली ‘अ’ जागा, ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण आहे अशी ‘ब’ जागा आहे, अशा प्रभागातील 'क' जागेवर सोडतीद्वारे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षीत केली जाईल.

- १२ प्रभागांपैकी सहा ते सात प्रभागातील ‘क’ जागा महिलांसाठी आरक्षीत होणार आहे, त्यामुळे या प्रभागातील पुरुषांचा पत्ता कट होणार आहे.

- यामुळे प्रभाग क्रमांक १, ७, ८, ११, १२,१४, १९,२२, २७, ३७, ३८, ५० या प्रभागांपैकी काही प्रभागातील दिग्गजांना धक्का बसणार आहे, त्यामुळे त्यांना दुसऱ्या प्रभागात उमेदवारीसाठी प्रयत्न करावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT