Pune Municipal Corporation and PMRDA sakal
पुणे

Pune Municipal : महापालिकेने पीएमआरडीला केला पावणे चौदा लाखाचा दंड

गणेशखिंड रस्त्यावर मेट्रो व उड्डाणपुलाचे काम सुरु असताना वाहतुकीचा वेग मंदावलेला आहेत, त्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

प्रशांत पाटील

पुणे - गणेशखिंड रस्त्यावर मेट्रो व उड्डाणपुलाचे काम सुरु असताना वाहतुकीचा वेग मंदावलेला आहेत, त्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तसेच उड्डाणपुलाचे गर्डर बसविताना महापालिकेने बांधलेली सीमा भिंत पडल्याने पुणे महापालिकेने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) नुकसान भरपाईची रक्कम वसूल करताना तीन पट दंड लावला आहे. तेरा लाख ७० हजार रुपयांची रक्कम महापालिकेकडे जमा करावी असे पत्र पाठवले आहे.

पीएमआारडीएतर्फे गणेशखिंड रस्त्यावर शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरु आहे. त्याच वेळी आचार्य आनंदऋषिजी महाराज चौक (पुणे विद्यापीठ चौक) येथे दुमजली उड्‌डाणपूल ही उभारला जात आहे. या रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा रस्ता ४५ मिटर रुंदीचा करण्याचे काम महापालिकेने सुरु केले आहे.

नानावटी बंगला ते आरबीआय दरम्यान दोन्ही बाजूस रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्या कामाची पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली. त्यामध्ये पीएमआरडीएकडून उड्डाणपुलाचे गर्डर टाकताना अति अवजड क्रेनचा वापर केला आहे. गर्डर टाकताना क्रेनची वाहतूक झाली, तसेच क्रेन पादचारी मार्गावर उभी करण्यात आली.

त्यामुळे एबीआयएल हाऊस, आनंद मोहिते, उज्वल मोहिते यांची मिळकत, एनएच ढाबा या ठिकाणी पदपथ, केबल डक्ट, डीडब्ल्युसी पाइप, कॅरजवे, सीमाभिंत इत्यादीचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी क्रेनमुळे पादचारी मार्ग पूर्णपणे खचला आहे. एनएच ढाबा येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या डब्ल्युएमएम वर माती टाकली असल्यामुळे, रस्त्याचा सबबेस खराब झालेला आहे.

गणेशखिंड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम पीएमआरडीएकडून सुरु असल्याने त्यांच्याकडूनच रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. पण या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांकडून महापालिकेवर टीका केली जात आहे. त्यामुळे महापालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी पाहणी केली असता त्यांना त्यावेळी पीएमआरडीएकडून महापालिकेचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.

त्यानुसार सीमा भिंतीचा खर्च १३ हजार २३६, पादचारी मार्ग २ लाख ७५ हजार ९९१, एनएच ढाबा कलव्हर्ट ८० हजार ७००, एबीआयएल हाऊस ७५ हजार ३८, आनंद मोहिते मिळकत १२ हजार रुपये असे एकूण ४ लाख ५६ हजार ९६५ रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यावर तीन पट दंड लावून १३ लाख ७० हजार ८९७ रुपये भरण्यास सांगितले आहे.

कंपनीला गुन्हा दाखल करण्याचा इशारा

मेट्रो व उड्डाणपुलाचे काम करताना महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करणे, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणे यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल का करण्यात येऊन नये अशी नोटीस महापालिकेने गणेश खिंड रस्त्यावर पीएमआरडीएतर्फे काम करणाऱ्या कंपनीला बजावली आहे. तीन दिवसात यावर खुलासा करण्याचे आदेश पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT