Bribe Case esakal
पुणे

Pune Bribe Case : पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकाला लाचप्रकरणी अटक

पुणे महापालिकेच्या नगर रोड (वडगाव शेरी) क्षेत्रीय कार्यालयातील एका आरोग्य निरीक्षकाला लाच मागितल्याप्रकरणी अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या नगर रोड (वडगाव शेरी) क्षेत्रीय कार्यालयातील एका आरोग्य निरीक्षकाला ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. २७) ही कारवाई केली.

याबाबत एका बिगारी मुकादमाने (वय ५५) तक्रार दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सचिन धर्मा गवळी (वय ३४) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

गवळी हे नगर रोड (वडगाव शेरी) क्षेत्रीय कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन- आरोग्य विभागात आरोग्य निरीक्षक आहेत. तर, तक्रारदार हे त्याच कार्यालयात बिगारी मुकादम म्हणून काम करतात. आरोपी गवळी याने या क्षेत्रीय कार्यालयातून बदली न करण्यासाठी तक्रारदाराकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत मुकादमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाकडे तक्रार दिली.

या तक्रारीची पडताळणी केली असता त्यात गवळी याने स्वत: आणि वरिष्ठांसाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हा दाखल करून गवळी याला अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: PM मोदींचा एक निर्णय अन् टाटांचा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड; 73 टक्के स्वस्त मिळतोय शेअर

Air Pollution : नाशिकचा वायू गुणवत्ता निर्देशांकात वाढ; वायू प्रदूषित शहरांच्या यादीत 113 स्थानावर

IPL 2025 Auction: विदर्भाच्या पाच खेळाडूचं नशीब फळफळलं, मिळाली मोठी किंमत; पण उमेश यादव 'अनसोल्ड'

Winter Care : हिवाळ्यात मुले सतत सर्दी, आणि खोकल्यानी आजारी पडतात का? तर या ४ हेल्दी पदार्थ बनवून खाऊ घाला.

"Love You" म्हणत अनुषाने भूषणच्या वाढदिवशी दिली प्रेमाची कबुली ? नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT