Pune Municipal Corporation sakal
पुणे

पुणे महापालिका पदोन्नती प्रकरण; निवृत्त न्यायाधिशांमार्फत होणार चौकशी

राज्यात बोगस भरतीचे प्रकरण गाजत असताना पुणे महापालिकेत कर्मचाऱ्यांनी बोगस पदविका मिळवून पदोन्नती घेतल्याने आरोपांची राळ उठली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात बोगस भरतीचे प्रकरण गाजत असताना पुणे महापालिकेत (Pune corporation) कर्मचाऱ्यांनी बोगस पदविका (fraud Degree) मिळवून पदोन्नती घेतल्याने आरोपांची राळ उठली आहे. यामध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप केला जात असताना आता याची उच्च न्यायालयाच्या (HighCourt) निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेत पदोन्नती मिळालेल्या ४० जणांची यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये १८ जणांनी जेआरएन राजस्थान विद्यापीठातून इंजिनिअरिंग डिप्लोमा केला आहे. यामध्ये ११ आरोग्य निरिक्षक, १ अतिक्रमण निरिक्षक, १ कनिष्ठ अभियंता विद्युत, १ विद्युत पर्यवेक्षक, १ इलेक्ट्रिशन, २ लिपिक टंकलेखक, १ बत्तीवाला आहे़ . यावर हरकत घेण्यासाठी एक महिन्याची मुदत होती, ती कमी करून केवळ सात दिवस देण्यात आली. त्यामुळे यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप यापूर्वीच आम आदमी पक्षाने केला आहे.

महापालिका सेवा अधिनियमानुसार ‘एआयसीटीई’ची मान्यता असलेल्या महाविद्यालयातूनच अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका प्राप्त केली तरच पदभरतीसाठी हे उमेदवार पात्र ठरतात. पण या सेवकांनी ज्या संस्थेची पदविका सादर केली आहे, त्यास ‘एआयसीटीई’ची मान्यता नाही. हे कर्मचारी पुण्यात काम करतात पण त्यांनी आसाम, राजस्थान, लातूर, सोलापूर येथील पदविका सादर केली. या पदविका डिस्टन्स एज्युकेशनमधून घेता येत नाही. महापौर कार्यालयातील एका कर्मचाऱ्यानेही अशीच पदविका मिळवून पदोन्नती घेतली आहे, त्यामुळे यामध्ये भाजप, राष्ट्रवादीतील संबंधित लोकांनी लाभ घेतला आहे. याप्रकरणी महापौरांनी प्रशासनाने चौकशी करावी असे सांगितले असले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले, ‘‘महापालिकेने विधी विभागाचा अभिप्राय घेऊन बढती दिली आहे. पण यात अनियमितता असल्याचा आरोप केला गेल्याने याप्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाईल. त्यांच्या चौकशीत जर पदोन्नती अयोग्य ठरली तर संबंधित कर्मचाऱ्यांना मुळ पदावर पाठवले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT