Pune Municipal Corporation sakal
पुणे

पुणे महापालिकेच्या भरती प्रक्रिया : कागदपत्र नसल्याने विद्यार्थी परीक्षेला मुकले

पुणे महापालिकेच्या भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण झाला. सहा पदांसाठी आलेल्या ऑनलाइन परीक्षा नोंदणीकृत ८६ हजार ९९४ उमेदवारांपैकी ६७ हजार २५४ जणांनी दिली.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे महापालिकेच्या भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण झाला. सहा पदांसाठी आलेल्या ऑनलाइन परीक्षा नोंदणीकृत ८६ हजार ९९४ उमेदवारांपैकी ६७ हजार २५४ जणांनी दिली.

पुणे - पुणे महापालिकेच्या भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण झाला. सहा पदांसाठी आलेल्या ऑनलाइन परीक्षा नोंदणीकृत ८६ हजार ९९४ उमेदवारांपैकी ६७ हजार २५४ जणांनी दिली. शिवणे येथे एका उमेदवाराला मोबाईलचा वापर करून कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले आले. तर अनेक ठिकाणी मुळ कागदपत्रांसह झेरॉक्स कॉपी उमेदवारांकडे नसल्याने त्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे.

गेल्या १० वर्षापासून पुणे महापालिकेत पदभरती झालेली नाही. त्याचा परिणाम कामकाजावर होत होता. राज्य शासनाने गेल्यावर्षी पदभरती करण्यास मान्यता दिल्यानंतर महापालिकेने पहिल्या टप्प्यात आवश्‍यक असलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली. यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १३५, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) ५, कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) ४, सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक १००, लिपिक २०० लिपिक आणि सहाय्यक विधी अधिकारी ४ असे एकूण ४४८ पदांची भरती सरळसेवेने करण्याचा निर्णय घेतला. यासाठीची ऑनलाइन परीक्षा ‘आयबीपीएस’कडून घेण्याचा निर्णय घेतला. या सर्वपदासांठी महापालिकेकडे एकूण ८६ हजार ९९४ अर्ज आले होते. त्यामध्ये सर्वाधिक अर्ज हे लिपीक पदासाठी आलेले आहेत. राज्यातील सुमारे १५ शहरात परीक्षा घेण्यात आल्या.

परीक्षेमध्ये बोगस उमेदवार बसू नयेत यासाठी उमेदवारांनी ओळखपत्राच्या मुळ प्रतिसह एक झेरॉक्सची प्रत घेऊन जाणे अनिवार्य होते. तसेच विवाहित महिला उमेदवारांची ओळख पटावी यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र सोबत घेणे आवश्‍यक होते. पण अनेक उमेदवारांनी केवळ मुळ ओळखपत्र व इतर कागदपत्र सोबत ठेवले, झेरॉक्स प्रत नसल्याने त्यांना अडविण्यात आले. तर काहींनी केवळ झेरॉक्सची प्रतच सोबत ठेवली होती. त्याचा फटका त्यांना बसला. काही जणांनी कागदपत्र, झेरॉक्स प्रत तयार करण्यासाठी धावपळ केली. पण वेळ अपुरा असल्याने त्यांना परीक्षेला मुकावे लागले. सहा पदांसाठी झालेल्या परीक्षेत ८६ हजार ९९४ उमेदवारांपैकी ६७ हजार २५४ जणांनी परीक्षा दिली. यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १२ हजार ७०४, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) १ हजार ४६९, कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) ९७, सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक २ हजार ३९३ , लिपिक ५० हजार ९२ लिपिक आणि सहाय्यक विधी अधिकारी ४९९ उमेदवारांनी परीक्षा दिली. संपूर्ण परीक्षेत सरासरी ७७.३० टक्के उमेदवारांनी परीक्षेला हजेरी लावली, अशी माहिती महापालिकेने दिली.

दरम्यान, बुधवारी एनडीएमधील केंद्रावर पवन मारक या उमेदवाराने परीक्षेमध्ये मोबाईल व हेडफोनचा वापर करुण त्याद्वारे बाहेर असलेला त्याचा मित्र अनिल भारतीला प्रश्‍नपत्रिकेचे फोटो पाठवून पेपर सोडवत होता. त्याला कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. पवन उत्तम मारक (वय २५, रा. औरंगाबाद) याच्यावर उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याचा साथीदार अनिल भारती (रा. जालना) याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. तुषार नामदेव बोरावके (वय ३१, रा. नर्हे) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

‘महापालिकेने सहा पदांची सरळसेवेने भरती सुरू केली आहे, त्याचा लेखी परीक्षेचा टप्पा आज पूर्ण झाला आहे. एकूण ७७.३२ टक्के उमेदवारांनी हजेरी लावली. परीक्षेला येताना मुळ कागदपत्र व झेरॉक्स प्रत, विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेऊन येणे अनिवार्य असल्याचे हॉल तिकिटावर लिहिले होते. पण अनेकांनी ते न आणल्याने परीक्षा देता आली नाही. कॉपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.’

- सचिन इथापे, उपायुक्त, सेवक वर्ग विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

IND vs NZ 2nd Test : ७ बाद १०३ धावा! Yashasvi Jaiswal ने इतिहास रचला, पण विराटसह इतरांनी पार केला कचरा

भारत स्वातंत्र्यानंतर मुंबई इलाख्यात कोल्हापूर अन् पहिल्या आमदारांपैकी बाबासाहेब खंजिरेंनाच मिळाली पुन्हा संधी!

IND vs NZ: काल अ‍ॅक्टींग करत मैदान गाजवले, आज ९व्या चेंडूवर त्रिफळे उडाले! Virat Kohli चे दोन भिन्न Video

SCROLL FOR NEXT