Drainage water purification project Sakal
पुणे

Water Recycle : पुणे महापालिका दररोज करणार २२ एमएलडी पाण्याचा पुनर्वापर

पुणे शहरात सध्या ४० टक्के पाण्याची गळती होत आहे. महापालिका रोज १८०० एमएलडी पाण्याचा वापर करत असून, त्यापैकी ४० टक्के म्हणजे ७२० एमएलडी पाणी वाया जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरात सध्या ४० टक्के पाण्याची गळती होत आहे. महापालिका रोज १८०० एमएलडी पाण्याचा वापर करत असून, त्यापैकी ४० टक्के म्हणजे ७२० एमएलडी पाणी वाया जात आहे.

पुणे - जल शुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध झाल्यानंतर उरलेले पाणी फिल्टर बेडमधून नाल्यामध्ये सोडून दिले. पण आता या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी नवीन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यातून पर्वती जलकेंद्रातून रोज १० एमएलडी आणि वारजे जलकेंद्रातून १२ एमएलडी पाण्याची बचत होणार आहे. ही यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी पावणे पाच कोटी रुपये खर्च येणार आहे.

पुणे शहरात सध्या ४० टक्के पाण्याची गळती होत आहे. महापालिका रोज १८०० एमएलडी पाण्याचा वापर करत असून, त्यापैकी ४० टक्के म्हणजे ७२० एमएलडी पाणी वाया जात आहे. समान पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर ही गळती ५० टक्क्यांनी म्हणजे दैनंदिन गळतीचे प्रमाण ३६० एमएलडी पर्यंत खाली येणार आहे. असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे.

महापालिकेच्या जल केंद्रांमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी प्रक्रिया केली जाते. त्यामध्ये सर्वात शेवटी जे अशुद्ध पाणी आहे ते नाल्यांमध्ये सोडून दिले जाते. पण या पाण्यावर वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करून ते शुद्ध करणे शक्य आहे. महापालिकेच्या पर्वती जलकेंद्रातून रोज १० एमएलडी तर वारजे जलकेंद्रातून १२ एमएलडी पाणी नाल्यात सोडून दिल्याने त्याचा अपव्यय होत आहे. पण आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही अपव्यय रोखणे शक्य होणार आहे. अशा प्रकारची यंत्रणा सध्या भामा आसखेड जलकेंद्रात असून तेथे रोज ७ एमएलडी, नवा पर्वती जलेकंद्र १० एमएलडी पाण्याची बचत होते.

केंद्र सरकारकडून १५ व्या वित्त आयोगातून महापालिकेला या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. पर्वती येथील वॉटर बेडमध्ये बदल करण्यासाठी २ कोटी ७५ लाख रुपये खर्च येणार आहे. तर वारजे येथे १२ एमएलडी पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी २ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यास पूर्वगणनपत्रक समिती (इस्टिमेट कमिटी) मंजुरी दिली आहे. तर जुना वडगाव, लष्कर, होळकर जलकेंद्रात ही यंत्रणा अद्याप बसलेली नाही. त्यामुळे रोज ९ एमएलडी पाणी वाया जात आहे.

‘४० टक्के पाणी गळतीमध्ये जलकेंद्रात पाणी शुद्ध केल्यानंतर उर्वरित जे पाणी सोडून दिले जाते त्याचाही समावेश आहे. पण आता हे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी जलकेंद्रातील यंत्रणेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल केल्याने रोज २२ एमएलडी पाण्याची बचत होईल.’

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग

२.९४ कोटीचा दंडही कमी होणार

महापालिका अतिरिक्त पाणी वापर करते त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला दंड ठोठावला जातो. या दोन जलकेंद्रातील यंत्रणेत केल्या जाणाऱ्या बदलामुळे दंडाची रक्कम कमी होऊन पैशाची बचत होईल. पर्वती जलकेंद्रातील पाणी बचतीमुळे १.४४ कोटी आणि वारजे जलकेंद्रातून १.५० कोटी रुपयांचे दंड कमी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT