Vadgaon : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील अंबाई माता मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अनधिकृत इमारतींवर महापालिका प्रशासनाने कारवाई केली. बांधकाम विभाग झोन क्रमांक दोनच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. यावेळी १० हजार चौरस फुटांवरील आर सी सी बांधकामे पाडण्यात आली.
बांधकाम विभागाने कारवाई करण्याच्या अगोदर हिंगणे खुर्द मधील आनंद विहार येथील बीडीपी झोन व धायरीतील अंबाई माता मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांना महापालिकेच्या वतीने नोटीस बजाविण्यात आली होती. कारवाई दरम्यान नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमा झाले होते. त्यांनी सुरुवातीला या कारवाईस विरोध केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, अधिकार्यांनी विरोध न जुमानता ही कारवाई सुरू केली. यावेळी अधिकारी व नागरिक यांच्यात मोठा वाद निर्माण झाला. दरम्यान अधिकाऱ्यांनी काही वेळ कारवाई थांबवून स्थानिक पोलिसांच्या मदतीच्या सहाय्याने कर्मचाऱ्यांसमवेत येऊन जमलेल्या जमावास पांगवून तणावग्रस्त परिस्थिती आटोक्यात आणून कारवाईस सुरुवात केली.
जेसीबी, ब्रेकर, गॅस कटर व बिगारी इत्यादींच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. या पुढे देखील परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करू नयेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या कारवाईमुळे या भागात अवैध बांधकामे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
सदर कारवाई बांधकाम विभाग झोन क्रमांक २ च्या वतीने करण्यात आली, कारवाई बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीधर येवलेकर व कार्यकारी अभियंता विलास नवाळी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईसाठी उप अभियंता विजय कुमावत, कनिष्ठ अभियंता महेश झोमन, मयूर गेडाम व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.