doctor sakal
पुणे

Pune News : आरोग्य विभागात तज्ज्ञ आणि प्रशिक्षित डॉक्टरांची अपुरी संख्या; रुग्ण वाऱ्यावर

तज्ज्ञ आणि प्रशिक्षित डॉक्टरांची अपुरी संख्या हे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य दुखणे. पण, त्यावर निश्चित रामबाण उपाय न करता केवळ मलमपट्ट्या करण्यातच प्रशासनाने धन्यता मानली.

योगिराज प्रभुणे

तज्ज्ञ आणि प्रशिक्षित डॉक्टरांची अपुरी संख्या हे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य दुखणे. पण, त्यावर निश्चित रामबाण उपाय न करता केवळ मलमपट्ट्या करण्यातच प्रशासनाने धन्यता मानली.

पुणे - तज्ज्ञ आणि प्रशिक्षित डॉक्टरांची अपुरी संख्या हे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य दुखणे. पण, त्यावर निश्चित रामबाण उपाय न करता केवळ मलमपट्ट्या करण्यातच प्रशासनाने धन्यता मानली. आताही वैद्यकीय महाविद्यालयातील बंधपत्रित डॉक्टर आणि करार तत्त्वावर भरती केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर महापालिकेची वैद्यकीय सेवा सुरु आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागात निवासी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आहारतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ अशी वर्ग दोनची १३ पदे आहेत. त्यात २६२ जागा मंजूर केल्या आहेत. त्यापैकी १६३ (६२ टक्के) जागा भरल्या असून, ९९ (३८ टक्के) जागा रिक्त आहेत. थेट रुग्णसेवेशी संबंधित या जागा आहेत. याच डॉक्टरांच्या आधारावर दर्जेदार रुग्णसेवा महापालिकेला देता येते. मात्र, या जागा अद्यापही भरलेल्या नाहीत. त्यामुळे मलमपट्टी करण्यासाठी बंधपत्रित (बॉन्डेड) डॉक्टर, करार तत्त्वावर नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) भरती केलेल्या डॉक्टरांच्या भरवशावर महापालिकेच्या आरोग्य सेवेचा डोलारा उभा आहे.

महापालिकेने ४८ आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची करारतत्त्वावर नियुक्ती केली आहे. एका वर्षासाठी त्यांना नियुक्तीपत्र दिले जाते. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ३५ डॉक्टरांना दवाखान्यात नियुक्त केले आहे. त्यापैकी १५ डॉक्टर अर्धवेळ काम करतात. तसेच, काही डॉक्टरांबरोबर सहा महिन्यांचेही करार केले आहेत.

३५ बंधपत्रित डॉक्टर

वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचे बंधपत्र (बॉण्ड) असते. त्यामुळे त्यांना एक वर्ष सरकारी किंवा महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा करणे बंधनकारक असते. त्या अंतर्गत महापालिकेत सध्या वैद्यकीय पदवीधारक ११ डॉक्टर वैद्यकीय अधिकारी म्हणून रुग्णसेवा करीत आहेत. तर, पदव्युत्तर पदवी झालेले २४ असे एकूण ३५ डॉक्टर आहेत.

प्रसूती, बालआरोग्याला प्राधान्य

प्रसूती आणि बालआरोग्य सेवेला महापालिकेने प्राधान्य दिले आहे. त्यासाठी महापालिका, करारतत्‍व, बंधपत्रित डॉक्टर आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर अशा सर्वांचा प्रभावी वापर यासाठी करण्यात येते. या सगळ्यातून महापालिकेत स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ २९ आणि बालरोग तज्ज्ञ २० आणि १२ भूलतज्ज्ञ नियुक्त केले आहेत, अशी माहिती पालिकेने दिली.

डॉक्टर का येत नाहीत?

  • वैद्यकीय काम सोडून लिखापडीची कामे लावली जातात

  • वारंवार बदल्या होतात

  • स्थानिक नगरसेवकांचा दबाव

असे आहेत पदव्युत्तर पदवीचे बंधपत्रित डॉक्टर

  • बालरोगतज्ज्ञ : ४

  • स्त्रीरोग तज्ज्ञ : ५

  • भूलतज्ज्ञ, फिजिशियन, रिडेओलॉजिस्ट : प्रत्येकी २

  • छाती विकार आणि क्षयरोगतज्ज्ञ, अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ, नवजात अर्भक तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, अस्थिरोग तज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञ, पॅथॉलॉजी- प्रत्येकी १

महापालिकेने आरोग्य विभागात डॉक्टरांची भरती करण्यासाठी कोरोना उद्रेकापूर्वी प्रक्रिया सुरू केली होती. त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात भरती निघाली होती. आता परत दुसऱ्या टप्प्यात वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट आणि रेडिओलॉजिस्ट भरतीची प्रक्रिया करणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात उर्वरित रिक्त पदांची भरती प्रक्रिया प्रस्तावित करण्यात येईल.

- डॉ. प्रल्हाद पाटील, आरोग्य प्रशासकीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT