Alcohol Party esakal
पुणे

Pune News : पुणे महापालिकेच्या वसतिगृहात दारू पार्टी; १४ विद्यार्थ्यांची हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या घोले रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात वर्षानुवर्षे राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी दारूच्या पार्ट्या करत धांगडधिंगा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा टीव्ही बंद असणे, कुचकामी सुरक्षा व्यवस्थेमुळे वसतिगृहातील बेशिस्तपणा वाढत असल्याने अभ्यासू विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.

राज्यातील कानाकोपऱ्यातून पुण्यात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुण्यातील राहण्याचा खर्च परवडत नसल्याने महापालिकेने घोले रस्त्यावर १०८ खोल्यांचे मोठे वसतिगृह बांधले आहे. तेथे ४०० जणांच्या राहण्याची सोय आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची सुविधा असल्याने त्यांना आर्थिक आधार मिळतो. तसेच महापालिकेतर्फे या विद्यार्थ्यांना जेवणाच्या खर्चासाठी दरमहा २ हजार १५० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. या वसतिगृहात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्गातील, तसेच ईडबल्युएस प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

या वसतिगृहात ११वी किंवा पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडणे अपेक्षित असते. पण एक पदवी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या पदवीसाठी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन वसतिगृह सोडले जात नाही.

महापालिकेकडून राहण्याची मोफत सोय, जेवणासाठी पैसे दिले जात असताना वसतिगृहात दारूच्या पार्ट्या सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, तंबाखूच्या पुड्या सापडल्या आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर समाज विकास विभागाने १४ विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी केली आहे. तसेच सुरक्षा विभागाकडे सात सुरक्षा रक्षकांची मागणी केली आहे.

महापालिकेच्या वसतिगृहात मद्यपान केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे १४ विद्यार्थ्यांना वसतिगृहातून काढून टाकले आहे. याठिकाणी एका पाळीला एक सुरक्षा रक्षक असतो, त्याऐवजी आता जास्त सुरक्षारक्षक नियुक्त केले जाणार आहेत. तसेच यापुढे वसतिगृहात अचानक तपासणी केली जाणार आहे.

- नितीन उदास, उपायुक्त, समाजविकास विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT