Ambegaon Drainage water street road 
पुणे

पुणे : आंबेगावात रस्त्यावर मैलामिश्रीत सांडपाणी; महापालिकेचे दुर्लक्ष

आंबेगाव बुद्रुक येथील नागरिकांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

किशोर गरड

आंबेगाव : आंबेगाव बुद्रुक गावठाणातील सांडपाणी वाहिन्याची दुरावस्था झाली असून परिसरातील रस्त्यावर मैलामिश्रीत सांडपाणी वाहते आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाली असल्याने, ग्रामस्थांच्यावतीने धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

द्वारकाई निवास ते शिवालय दरम्यान असणारी ड्रेनेज लाइन एप्रिल महिन्यापासून चोक अप झाली असून त्यातून मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहते आहे. द्वारकाई आणि शिवालयसह इतर पाच सोसायटीमध्ये साधारण ऐंशी कुटुंब वास्तव्यास आहेत.धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय महापालिका कार्यालयाकडे ग्रामस्थांच्या वतीने वारंवार अर्ज विनंत्या केल्या जात आहेत. पालिकेकडून दिखाऊ काम केले जाते परंतु यावर ठोस पाऊल महापालिका उचलताना दिसत नाही.

साचलेल्या आणि रस्त्याने वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे सोसायटीतील लहान मुले मोठ्याप्रमाणावर आजारी पडल्याचेही ग्रामस्थ सांगत आहेत. तर दरवर्षी न चुकता जनतेकडून कर वसुल करणारी महापालिका मूलभूत सुविधा पुरविण्यासही समर्थ नाही.त्यामुळे महापालिकेच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

का होतात ड्रेनेज लाइन चोक अप?

आंबेगाव बुद्रुक गावठाणातील सांडपाणी वाहिन्या ह्या २००२ मध्ये ग्रामपंचायतकडून टाकण्यात आलेल्या आहेत.त्यानंतर,सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टी दरम्यान गावातील सर्व ड्रेनेज लाइन चोक अप झाल्या होत्या. त्यावेळची लोकसंख्या पाहता ग्रामपंचायतकडून टाकण्यात आलेल्या सांडपाणी वाहिन्या चोक अप होत नव्हत्या. आता आंबेगावची लोकसंख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे.त्यामुळे कमी व्यासाच्या असणाऱ्या ड्रेनेज लाइनमध्ये सांडपाणी मावत नाही.त्यामुळे त्या वारंवार चोक अप होत आहेत.

धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाला एप्रिल पासून पत्रकार व्यवहार करतो आहे. त्यावर तुटपुंज्या स्वरूपाचे काम पालिका करत आहे.८ ते ९ नवीन ड्रेनेज पाईप महापालिका टाकू शकत नाही ही वाईट गोष्ट आहे. महापालिकेने योग्य ती कार्यवाही केली नाही तर ठिय्या आंदोलन करणार आहे.

-दिपक बेलदरे, आदर्श माजी सरपंच आंबेगाव बुद्रुक

'रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याचा वास येतो आहे. शिवाय मच्छरचा त्रास वाढला आहे. लहान मुलं आजारी पडत आहेत. एप्रिल पासून ड्रेनेजचा प्रॉब्लम आहे. त्यामुळे दूषित पाणी येते आहे.

- मानसी कोंढरे,स्थानिक शिवालय अपार्टमेंट,आंबेगाव बुद्रुक

'जितका मेंटेनन्स आपल्याला करता येईल तितका आपण करतो आहोत.तीस ते पस्तीस मीटर चोक अप झालेली लाइन बदलावी लागेल.तेवढा विकासनिधी सद्या उपलब्ध नाही.

-राजेंद्र गायकवाड, कनिष्ठ अभियंता धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT