उंड्री : नव्याने समाविष्ट गावांना करआकारणी भरमसाठ केली आहे. मात्र, त्या तुलनेत सुविधा मिळत नाहीत. पूर्वी ग्रामपंचायतीचा कर आणि महापालिकेत गावे समाविष्ट केल्यानंतर वाढीव कर, नागरिकांच्या भावना समजून घेऊन निर्णय घेतला पाहिजे होता. मात्र, तसे होताना दिसत नाही, पालिकेतील ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे नगरपालिका करण्याची वेळ आल्याची खंत आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केली.
उंड्री (ता. हवेली) येथे उंड्री कृती समितीच्या वतीने आमदार संजय जगताप यांना निवेदन देण्यात आले.जगताप म्हणाले की, पालिकेने लादलेला वाढीव कर, टीपीएस क्र.२,३,४,५ संदर्भात विविध प्रश्नासह महत्त्वाचा पाणी प्रश्नाविषयी माहिती सोडवण्याबाबत चर्चा केली. रस्ते, ड्रेनेज, लाईट, झोनिंगबाबत आयुक्तांनी सूचना केल्या. वडाचीवाडी, औताडेवाडी, हांडेवाडी, होळकरवाडी येथील टीपीएस संदर्भात जलजीवन मिशन अमृत-२ स्कीमद्वारे खडकवासला धरणातून पाण्याची योजना राबवून दक्षिण पुण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तसेच, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून, लवकर चांगला निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.उंड्री ः आमदार संजय जगताप यांना उंड्री येथे कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.