pune nashik highway road contruction traffic transport bhosari sakal
पुणे

Pune News : पुणे नाशिक महामार्गावर सेवा रस्ता केव्हा होणार?

पुणे-नाशिक महामार्गालगत सेवा रस्ता नसल्याने वाहन चालकांना जीव धोक्यात घालून उलट्या दिशेने महामार्गावरुनच वाहने चालवावी

सकाळ वृत्तसेवा

भोसरी – पुणे-नाशिक महामार्गालगत सेवा रस्ता नसल्याने वाहन चालकांना जीव धोक्यात घालून उलट्या दिशेने महामार्गावरुनच वाहने चालवावी लागतात. अनेक वर्षांपासून रखडलेला सेवा रस्ता कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पुणे-नाशिक महामार्गालगत वसलेल्या धावडेवस्ती, सद्गुरूनगर, जयगणेश साम्राज्य, लांडगेनगर आदी भागांकडे ये-जा करण्यासाठी सेवा रस्ता नाही. सद्गुरू डेपो चौक ते हवेली हाॅटेल या सुमारे पाचशे मीटर सेवा रस्त्याचा अपवाद सोडला तर या परिसरात सेवा रस्ताच नाही. नाशिक-पुणे महामार्गावर तर स्पाइन रस्त्यावरील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भोसरीपर्यंत सेवा रस्ताच नाही.

याच रस्त्यालगत सद्गुरुनगर वसले आहे. भोसरीवरून सद्गुरूनगरकडे जाण्यासाठी महामार्गाने उलट्या दिशेने जावे लागते. याअगोदर या रस्त्यावर अपघात होऊन अनेक नागरिक जखमीही झाले आहेत. लांडेगेनगरकडे जातानाही वाहन चालकांना उलट्या दिशेने जावे लागते. त्यामुळे येथे वाहन चालाकांना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे-नाशिक महामार्गालगत सेवा रस्ता तातडीने करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

अतिक्रमण हटावाची वर्षपूर्ती

पुणे-नाशिक महामार्गालत टपऱ्या, हातगाड्यांसह काहींनी अनधीकृत बांधकाम करत इमारती उभारुन अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणावर महापालिकेद्वारे गेल्या वर्षी मे महिन्यात मोठी कारवाई करत भोसरी ते मोशी दरम्यानची सर्व अतिक्रमणे काढली होती. पुणे-नाशिक महामार्गाच्या विकासकामात दिरंगाई झाल्यास पुन्हा येथे अतिक्रमण होण्याची भिती काही नागरिकांनी बोलून दाखविली.

पुणे-नाशिक महामार्गालगत सेवा रस्ता नसल्याने महामार्गावरून उलट्या दिशेने जाणाऱ्या वाहन चलकांना बऱ्यावेळा अपघात झाला आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यासाठी महामर्गावर सेवा रस्ता तातडीने होणे गरजेचे आहेच.

-अंकुश दिघे, इंद्रायणीनगर

नाशिक फाटा ते खेड पर्यंतच्या पुणे नाशिक महामार्गाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महानमार्ग महामंडळकडे सादर केला आहे. सुमारे तीस किलोमीटरच्या या रस्त्यासाठीच्या विकासासाठी सहा हजार कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे. यास केंद्राची मंजूरी मिळाल्यावर या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल.

-अनिल गोरड, व्यवस्थापक (तांत्रिक) राष्ट्रीय महामार्ग, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Supriya Sule: बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात; पण मुलांच्या शिक्षणासाठी निधी नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT