pune new police stations approved sakal
पुणे

Pune: पुण्यात सात नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी, ६० कोटींच्या निधीची तरतूद

Pune: गृह विभागाने पुणे पोलिस आयुक्तालयात सात नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी सुमारे ६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: गृह विभागाने पुणे पोलिस आयुक्तालयात सात नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी दिली आहे. त्यासाठी सुमारे ६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शहराचा वाढता विस्तार आणि कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन पोलिस ठाण्यांमधील कामकाज येत्या आठवडाभरात सुरू होइल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

पुणे पोलिस आयुक्तालयात सध्या ३२ पोलिस ठाणी आहेत. पोलिस आयुक्तालयातील भारती विद्यापीठ, सिंहगड रस्ता, चतु:शृंगी, लोणी काळभोर, लोणीकंद, हडपसर, वानवडी आणि कोंढवा पोलिस ठाण्यांचे विभाजन करून नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी ही नवीन पोलिस ठाणी सुरू होणार आहेत. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. नवीन पोलिस ठाणी सुरू करण्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे.

नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीमुळे शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे. नवीन पोलिस ठाण्यांच्या पायाभूत सुविधांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, नवीन ८१६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजुरी मिळाली आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

नवीन पोलिस ठाणे आणि प्राप्त निधी-

  • आंबेगाव - ७ कोटी ९ लाख

  • नांदेड सिटी - ८ कोटी ६० लाख

  • बाणेर - ८ कोटी ६० लाख

  • खराडी- ७ कोटी ५० लाख

  • वाघोली - ८ कोटी ७५ लाख

  • काळेपडळ - १० कोटी २४ लाख

  • फुरसुंगी - ८ कोटी ८१ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT