baramati news  sakal
पुणे

Pune News : शिक्षणाचा वेध घेणारा `बारामती पॅटर्न` विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने फायद्याचा

तेलंगणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालकांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा

 कल्याण पाचांगणे

माळेगाव - बारामती सर्वांगिण विकासातील प्रगतीचे पावले टाकत आहे. विशेषतः मुलांच्या करिअरच्या दृष्टीने पुण्यानंतर बारामतीमध्ये शैक्षणिक दालने नव्याने पुढे आली आहेत. बारामतीसह ग्रामीण भागातील अनेकजण केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमार्फत यश मिळवत आहेत, तर काहीजण राज्यात,

देशात सेवा देत आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देताना बारामती पॅटर्न तयार होतोय याचे मनस्वी समाधान आहे, असे प्रतिपादन तेलंगणा राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक ( गुन्हे अन्वेषण विभाग ) महेश भागवत यांनी बारामतीत व्यक्त केले.

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट- बारामती या संस्थेच्यावतीने शारदानगर येथे आयोजित केलेल्या विद्यार्थी संवाद मेळाव्यात तेलंगणा राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश भागवत बोलत होते. अॅग्रीकल्चरल ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून वरील उपक्रम राबविण्यात आला.

अधिकारी श्री. भागवत यांच्या संवादातून आणि अनुभावातून यावेळी उपस्थित दीड हजारांपेक्षा अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निखळ आनंदही मिळाल्याचे दिसून आले. 

यावेळी स्कायडायव्हर पद्मश्री पुरस्कार विजेत्या शीतल महाजन,  हवामान बदल व पर्यावरण तज्ज्ञ डॉ.गिरिजा गोडबोले, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, उद्योगपती कल्याण तावरे, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे सीईओ निलेश नलावडे,  मानव संसाधन अधिकारी गार्गी दत्ता,  शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकुमार महामुनी, संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, अधिकारी श्री. भागवत यांनी लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा, अभ्यासक्रम, परीक्षांचे टप्पे, मुलाखतीचे तंत्र, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांची दिनचर्या, अभ्यासातील नियमितता, चोविस तासाचे वेळापत्रक आदी मुद्यांच्या आधारे मार्गदर्शन केले.

ते म्हणाले,``बारामती तालुक्याला वैभवशाली ऐतिहासिक परंपरा आहे. येथील वाडे, किल्ले, मंदिरे गतकाळातील समृद्ध वारशाची साक्ष देतात. हे वास्तूवैभव वाढविण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी चांगले काम करीत आहेत. विशेषतः या प्रक्रियेत मुलांच्या करिअरच्या दृष्टीने पुण्यानंतर बारामतीमध्ये शैक्षणिक दालने नव्याने पुढे आली आहेत.

परिणामी या भागातून अनेक मुल, मुली स्पर्धा परिक्षेत यशस्वी होताना दिसतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देताना बारामती पॅटर्न नावारुपाला येऊ लागला आहे.`` ``सध्याची आरोग्यवस्था सांभाळने कठीन होऊन बसले आहे. त्यातही आपले आरोग्य अबाधित ठेववण्यासाठी आवडता छंद जोपासा, स्पोर्ट्समध्ये माहिती घ्या, एनसीसी, एनएसएस, अशा प्रकारचे आभ्यासपूरक व अभ्यासेत्तर उपक्रमात सहभाग घ्यावा, `` असे आवाहन करीत श्री. भागवत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपला बायोडेटा मजबूत करण्याचा सल्ला दिला.

तत्पुर्वी पद्मश्री पुरस्कार विजेत्या शीतल महाजन यांनी स्कायडायविंग क्षेत्रातील आपला प्रवास कथन करीत उपस्थितांना प्रेरक मार्गदर्शन केले. तसेच डॉ. गिरिजा गोडबोले यांनी वातावरण व हवामान बदला नुसार शेती कशी करता येईल, पर्यावरण विभागातील करिअरची संधी याबाबत मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील मतदारांच्या मनात काय? नागरिकांना ५ दिवसांआड पाणी अन् व्यापाऱ्यांना पार्किंगची अपेक्षा; विडी उद्योगातील महिलांना मुला-मुलींच्या भविष्याची चिंता

Sharad Pawar: संघटनेत सक्रिय राहून पक्ष बांधणी करणार!

कांदा उत्पादक पुन्हा अडचणीत! ओल्या कांद्याच्या भावात ६०० रुपयांची घसरण; प्रतिक्विंटल २६०० रुपयांचा सरासरी भाव; अवकाळी पावसाची शेतकऱ्यांना धास्ती

IND vs SA 2nd T20I: द. आफ्रिकेच्या अचुक माऱ्यासमोर भारताची फलंदाजी गडगडली! यजमानांना मालिकेत बरोबरीसाठी १२५ धावांची गरज

Nashik Crime: शीर धडावेगळं व्हायचंच बाकी होतं! नाशिकमध्ये मांजाने घेतला एकाचा जीव

SCROLL FOR NEXT