Latest Lepord News: पहाटे साडेचार वाजण्याची वेळ,दुचाकी वरून जाणाऱ्या जोडप्याचा निरगुडसर-पिंपळगाव रस्त्यावरील बेलसरवाडी येथील पूलावर दोन बिबट्यांनी रस्ता रोखल्याने दोघांची चांगलीच भंबेरी उडाली.
दोन वेळा जाऊन देखील बिबट्या रस्त्याच्या कडेलाच हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता,अखेर चारचाकी गाडी आली आणि त्यागाडीचा आश्रय मिळाल्याने बिबट्यापासून सुटका झाली त्यामुळे दुचाकीस्वरांनो जरा जपून बिबट्यापासून सावधान ही घटना सोमवार (ता.०९) रोजी पहाटे घडली.
निरगुडसर ते पिंपळगाव रस्त्यावर पहाटेपासूनच वाहतूक सुरू होते त्यामध्ये अनेक दुचाकीवरून प्रवास करत असतात परंतु गेल्या काही दिवसात निरगुडसर ते पिंपळगाव दरम्यान भराडी फाटा,बेलसरवाडी परिसर,काळकाई वस्ती,गव्हाळी या भागात अनेक वेळा बिबट्यांचे दर्शन घडत आहे त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण बेलसरवाडी परिसरात आहे.
त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना भीतीचे वातावरण पसरले आहे.सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बेलसरवाडी येथील पुलावर असलेल्या कांद्याच्या बराखी जवळ दोन बिबटे होते यावेळी पहाटे दुचाकी वरून प्रवास करताना एक जोडपे पुलाजवळ जाताच दोन बिबटे दिसले,आणि क्षणात गाडी मागे वळवली त्यानंतर पुन्हा धाडस करून गाडी पुढे नेली पण दोन बिबटे जाग्यावर होते यामुळे पुढे जाण्याची हिंमत होईना,जर पुढे गेले असते तर बिबट्यांनी झडप मारली असती अशा प्रकारे गाडी अडवल्याने दुचाकीस्वरांची चांगलीच भंबेरी उडाली.
बऱ्याच वेळ हे दोघे जण २०० मीटर अंतरावर थांबून होते यावेळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास निरगुडसर बाजूकडून आलेल्या चारचाकी चालकास हा प्रकार सांगितला त्यानंतर या चारचाकी गाडीचा आश्रय घेऊन रस्ता पार केला यावेळी चारचाकी गाडी पाहून बिबट्यांनी धूम ठोकली आणि दुचाकीस्वरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
निरगुडसर-पिंपळगाव रस्त्यावर प्रवास करताय जरा जपून बिबट्या मुळे प्रवास धोकादायक बनला असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी प्रवाशी नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.