पुणे

ई मोबिलीटी, सार्वजनिक वाहतुकीस प्रोत्साहन 

मीनाक्षी गुरव

पुणे - वायुप्रदूषण रोखण्यासाठी सुरक्षित, सोईस्कर आणि स्वस्त दरात सार्वजनिक वाहतूक, सायकल चालविण्यास प्राधान्य याबरोबरच इलेक्‍ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी डीझेल वाहनांवर आगामी काळात बंदी आणण्यासंदर्भात धोरणाची आखणी, अशी पावले प्रामुख्याने युरोपीय देशांत उचलली जात आहेत. हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध आजारांमुळे जगभरात दरवर्षी जवळपास 40 लाख नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. म्हणूनच जगभरातील अनेक देशांनी राक्षसरूपी वायुप्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. 

जगभरातील विविध देश वायुप्रदूषण कमी करण्यासाठी पुढे सरसावले असून, त्यांनी काही धोरणात्मक बदलही केले आहेत. 

जर्मनीमधील फ्रीबर्गमध्ये 500 किलोमीटरचा रस्ता हा केवळ दुचाकी, ट्राम आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चारचाकी वाहन खरेदी न करता जीवन जगणाऱ्या नागरिकांना सरकारतर्फे स्वस्तात घरे, विनामूल्य सार्वजनिक वाहतूक आणि सायकल दिल्या जातात. 

नेदरलॅंडमध्ये सर्व प्रकारच्या पेट्रोल आणि डीझेल वाहनांच्या विक्रीवर 2025 पर्यंत बंदी आणण्याचा विचार राजकीय वर्तुळात सुरू आहे. केवळ इलेक्‍ट्रिक आणि हायड्रोजनच्या साहाय्याने वाहने चालविण्यात यावीत, यावर भर दिला जाणार आहे. सायकल चालविण्याला प्राधान्य दिले जात आहे. 

फ्रान्समधील पॅरिससारख्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळी वीकेंडला "कारबंदी' आहे. सम-विषम वाहनांना दिवसाआड बंदी, प्रदूषण अधिक झाल्यास सार्वजनिक वाहतूक मोफत देण्याचा किंवा कार आणि दुचाकी "शेअरिंग'चा उपक्रमही येथे राबविला जातो. 

युरोपातील माद्रिद, ऍथेन्स, मेक्‍सिको या शहरांनी 2025 पर्यंत डीझेल कारवर बंदी आणण्याची तयारी दर्शविली आहे, तर काही शहरांनी अधिक धूर येणाऱ्या डीझेल कारवर तात्पुरती बंदी आणण्याबाबतची अंमलबजावणी सुरू केली आहे. 

नॉर्वेत इलेक्‍ट्रिक वाहनांवर भर  
वाहनांतून होणारे वायुप्रदूषण कमी करण्यासाठी "इलेक्‍ट्रिक कार'चा पर्याय उपयुक्त ठरत आहे. या वाहनांमुळे कार्बन डाय-ऑक्‍साईडचे प्रमाण 30 टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता वर्तविली जाते. इलेक्‍ट्रिक वाहनांच्या क्रांतीपासून जगभरातील अनेक देश अद्याप कोसो दूर असले तरी नॉर्वे मात्र याला अपवाद ठरले आहे. नॉर्वेमध्ये सध्या विक्री होणाऱ्या पाचपैकी एक कार ही बॅटरीवर चालणारी आहे. नॉर्वेमध्ये 2004 मध्ये केवळ 133 "लाइट-ड्यूटी प्लग इन इलेक्‍टिक व्हेईकल'ची नोंदणी झाली होती, तर 2016 मध्ये 50 हजार 875 वाहनांची नोंद झाली आहे. 2025 पर्यंत पेट्रोल किंवा डीझेल इंजिनावर चालणारी एकही कार विकली जाणार नाही, अशा "ई-मोबिलिटी' धोरणाची आखणी नॉर्वे सरकारने केली आहे. 

काही वर्षांपूर्वी चीनमध्ये बीजिंग येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान वायुप्रदूषण कमी करण्यासाठी "बंद अभियान' सुरू केले होते. ऑलिंपिक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर प्रदूषण रोखण्यासाठी सम आणि विषम नंबर प्लेटची वाहने दिवसाआड चालविणे, प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक कंपन्यांनाही अस्थायी स्वरूपात बंद ठेवणे, सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या उद्योगधंद्यांच्या कामाचे तास दोन महिन्यांसाठी कमी करणे, असे काही निर्णय घेतले होते. 

- जर्मनीमधील फ्रीबर्गमध्ये 500 किलोमीटरचा रस्ता केवळ दुचाकी, ट्राम व सार्वजनिक वाहतुकीसाठी. 
- चारचाकी वाहन खरेदी न करणाऱ्यांना स्वस्तात घरे, विनामूल्य सार्वजनिक वाहतूक. 
- फ्रान्सच्या पॅरिसमध्ये वीकेंडला "कारबंदी' 
- माद्रिद, ऍथेन्स, मेक्‍सिको शहरांची 2025 पर्यंत डीझेल कारवर बंदीची तयारी. 
- नॉर्वेत "ई-मोबिलिटी' धोरणाची आखणी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT