bhor sakal
पुणे

Pune News : भोर मधील शिक्षक नसलेल्या शाळांसह शिक्षण विभागाला कुलूप ठोकणार - लहू शेलार

भोरमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदाधिकारी आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

भोर - शैक्षणीक वर्ष सुरु होऊन चार झाले तरीही भोर तालुक्यातील २७४ शाळांपैकी ४२ शाळांवर शिक्षकांची संख्या शून्य आहे. आणि प्राथमिक शिक्षकांच्या मंजूर ७८९ पदांपैकी २७७ जागा (म्हणजे ३५ टक्के जागा) रिक्त आहेत. याशिवाय केंद्रप्रमुखांच्या १७ जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून उपस्थित शिक्षकांवर कामाचा अतिरीक्त ताण पडत आहे.

पुढील आठवडाभरात जर भोर तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरून शून्य शिक्षक असलेल्या शाळा सुरु केल्या नाहीत. तर अशा शाळांना आणि पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला कुलूप लावणार असा इशारा माजी सभापती लहू शेलार यांनी दिला. अशा आशयाचे पत्र जिल्हा परिषदेला पाठविले असून त्याची प्रत त्यांनी गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांना दिली आहे.

म्हणाले, भोर तालुका डोंगराळ भागात येत असल्यामुळे शिक्षक येण्यास तयार नसतात. आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागांची संख्या कमी आहे. शिक्षक नसलेल्या शाळांमध्ये शेजारच्या शाळेतील शिक्षक पाठवून शाळा कशाबश्या सुरु ठेवल्या आहेत.

आमच्या शाळेवर शिक्षकांची नेमणूक करा नाहीतर आम्ही शाळा बंद करू अशी भूमीका शून्य शिक्षक असलेल्या शाळांच्या ग्रामस्थांनी घेतली आहे. याशिवाय तालुक्यातील गटशिक्षणाधिका-यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. परंतु भोरचा पदभारही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

भोर तालुक्यातील २७४ प्राथमिक शाळांमधील ९ हजार ७११ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये २५ जुलै रोजी शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागांची माहिती पुढीलप्रमाणे कंसात रिक्त जागांची टक्केवारी - भोर (३५ टक्के), वेल्हे (४२ टक्के), आंबेगाव (१७ टक्के), बारामती (८ टक्के), दौंड (१४), हवेली (१५), इंदापूर (५), जुन्नर (१३), खेड (२३), मावळ (२०), मुळशी (२०), पुरंदर (९) आणि शिरुर (११). या टक्केवारीमध्ये काहीसा बदल झालेला आहे.

प्रशासकीय अधिका-यांचा मनमानी कारभार.

मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका नाहीत. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये मागणी करणारे आणि भांडून शिक्षकांच्या जागा भरायला सांगणारे पदाधिकारी नाहीत. आणि अधिकारी मनमानी कारभार करीत आहेत. त्यामुळे भोर-वेल्ह्यातील शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

शिक्षक समानीकरणाचा नियम धाब्यावर

शिक्षकांच्या समानीकरण नियमानुसार प्रत्येक तालुक्यात रिक्त जागांची संख्या ही समान असावी. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला याची पूर्ण माहिती नसावी. यामुळेच भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मात्र इतर तालुक्यात कमी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT