gravitational-waves- sakal
पुणे

Pune : प्रथमच शोधले सुक्ष्म गुरूत्वीय लहरींचे अस्तित्व; भारतीय शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण सहभाग

सम्राट कदम

Pune - कमी वारंवारितेच्या गुरूत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा पहिला पुरवा शास्त्रज्ञांनी जगासमोर सादर केला आहे. अभिमानाची बाब म्हणजे भारतीय खगोलशास्त्रज्ञांचा यात अत्यंत महत्त्वपूर्ण सहभाग आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर शास्त्रज्ञांनी गुरुवारी(ता. २९) पहाटे साडेपाच वाजता या संबंधीची घोषणा केली. तर पुण्यात राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राने (एनसीआरए) पत्रकार परिषदेत या संबंधीची माहिती दिली. विशेष म्हणजे एकाच दिवशी १६ शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आले आहे.

भारतासह युरोप आणि जपानच्या शास्त्रज्ञांचा यात सहभाग आहे. विश्वातील सर्वोत्तम घड्याळ मानले जाणाऱ्या पल्सार ताऱ्यांचे निरीक्षणाच्या माध्यमातून हे संशोधन पुढे आले आहे. यासाठी नारायणगाव जवळील अद्ययावत जायंट मिटरव्हेव रेडिओ टेलिस्कोपने (जीएमआरटी) महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

२०१५ मध्ये लायगो आणि व्हर्गो या प्रयोगशाळांनी गुरूत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध केले होते. आता युरोपीयन आणि इंडियन पल्सार टायमिंग अरे या समुहातील शास्त्रज्ञांनी सूक्ष्म वारंवारितेचा लहरींचा प्रथमच शोध घेतला आहे. जगभरातील सहा रेडिओ दुर्बिणींच्या सहाय्याने मागील २५ वर्षात एकत्रित केलेल्या विदाच्या विश्लेषणाच्या आधारे सुक्ष्म गुरुत्वीय लहरींची अस्तित्व सिद्ध झाले आहे.

गुरूत्वीय लहरींचा परिणाम पल्सार ताऱ्यांच्या नोंदीवर होत असल्याचे आईन्स्टाईनने सांगितले होते. अतिशय सुक्ष्म असलेल्या बदलातील निरीक्षणांना इतर गोंधळाच्या निरीक्षणातून वेगळे करण्यासाठी जीएमआरटीच्या नोंदींचा उपयोग झाला आहे. अनेक दशकांच्या शोधानंतर या सूक्ष्म गुरूत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध झाले आहे.

- प्रा भालचंद्र जोशी, शास्त्रज्ञ, एनसीआरए

सर्व प्रकारच्या लहरींमध्ये गुरूत्वीय लहरी शोधण्याचा शास्त्रज्ञांचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून पल्सार टायमींग अरे संबंधी संशोधन करण्यात आले आहे. कमी वारंवारितेच्या रेडिओ लहरींचे निरीक्षण घेणाऱ्या अद्ययावत जीएमआरटीचा यात महत्त्वपूर्ण सहभाग आहे.

- प्रा. यशवंत गुप्ता, संचालक, एनसीआरए

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND Vs New Zealand Test: भारतीय संघाची घोषणा; बुमराहची मोठी झेप! उप कर्णधारपदाची माळ पडली गळ्यात

Video: सत्तेला धरा, हीच विचारधारा!; सयाजी शिंदेंचं जुनं रिल अन् मिम्स व्हायरल

Latest Marathi News Updates: दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

Sayaji Shinde NCP: "मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या पण..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर सयाजी शिंदेंनी मांडली भूमिका

IND vs NZ: भारताविरूद्ध घेणार आक्रमक पवित्रा; न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितली रणनीती

SCROLL FOR NEXT