pune news
पुणे

Pune News : भेसळयुक्त खतामुळे बोरीमधील शेतकरी आक्रमक...

खासगी कंपनीचे प्रतिनिधी नॉटरिचेबल; कंपनीला टाळे...

राजकुमार थोरात

वालचंदनगर - येथे भेसळयुक्त रासायनिक खतामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी खत निर्मिती करणाऱ्या बारामतीमधील एमआयडीसी कंपनीच्या अधिकाऱ्या जाब विचारण्यासाठी गेले होते. मात्र संबधित कंपनीचे प्रतिनिधी नॉट रिचेबल असून रातोरात कंपनीला टाळे ठोकून गायब झाले झाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

इंदापूर तालुक्यातील बोरी,बिरंगुडी परीसरातील शेतकऱ्यांनी द्राक्षाचे घड,काडी व फळाच्या वाढीसाठी बारामतीमध्ये निर्मिती होत असलेल्या खासगी कंपनीच्या सल्फेट ऑफ पोटॅश (एसओपी) या रासायनिक खताचा वापर केला होता. या खतामध्ये तणनाशकाची भेसळ असल्याने द्राक्षाच्या झाडांच्या पानांची वाढ खुंटली तसेच काडीची वाढ झाली नाही.

पाने करपू लागली असून चालू वर्षीचा द्राक्षाचा हंगामाच वाया गेला असून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.यासंदर्भात द्राक्ष बागायतदार संघाच्या शास्त्रज्ञांनी कृषी विभाग,पंचायत समिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने खत व द्राक्षाच्या पानांचे,काडीचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठवले आहेत.

शेतकऱ्यांनी खासगी लॅबमध्ये खताचे नमुने तपासले असून यामध्ये तणनाशकाचा अंश आढळला आहे.यासंदर्भात कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा सुरु होती. कंपनीचे प्रतिनिधी व शेतकऱ्यांची आज शनिवारी (ता.२२) सकाळी बाेरीमध्ये बैठक होणार होती.मात्र संबधित कंपनीच्या प्रतिनिधींनी अचानक नॉट रिचेबल झाल्याने शेतकऱ्यांनी बारामतीमध्ये खताचे उत्पादन होणाऱ्या ठिकाणी गेले होते. मात्र कंपनीला टाळे होते तसेच फलक ही गायब केले होते.

यावेळी द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे विभागाचे अध्यक्ष भारत शिंदे यांनी सांगितले बोरी परीसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आम्ही कंपनीच्या प्रतिनिधीशी बोलत होतो. रात्री बोलणे झाले होते. आज सकाळी नुकसान भरपाईसंदर्भात बैठक आयाेजित केली होती.मात्र संबधित कंपनीचे प्रतिनिधी नॉट रिचेबल झाल्याने शेतकऱ्यांनी कंपनीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.मात्र कंपनी बंद होती.यावेळी बोरी प्रगतशिल शेतकरी रामचंद्र शिंदे,गणेश सांगळे, गुणवंत शिंदे,संतोष जगताप,दुकानदार योगेश शिंदे उपस्थित होते.

खतामध्ये ८ टक्केचे पोटॅश...

यासंदर्भात द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे विभागाचे अध्यक्ष भारत शिंदे यांनी सांगितले की,संबधित भेसळयुक्त सल्फेट ऑफ पोटॅश (एसओपी)रासायनिक खताचे नमुने आम्ही खासगी लॅबमध्ये तपासले आहेत. यामध्ये २-४- डी या तणनाशकाचे प्रमाण ५.९६ टक्के आढळले आहे.तसेच खतामध्ये ५० टक्के पोटॅश असणे गरजेचे होते. मात्र ५० टक्के ऐवजी फक्त ८ टक्के पोटॅश असून या खतामुळे बाेरी परीसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.

कंपनीचा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न...

रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या खासगी कंपनी बारामतीमधील एमआयडीमध्ये आहे. या कंपनीने त्यांचे फलक रात्रीमध्ये काढले असून कंपनीची जाहिरात असणारे पोस्टर व खते ही जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT