पुणे

German Bakery Blast: पुणे पोलिसही झाले ‘स्ट्राँग’!

सकाळवृत्तसेवा

पुणे - जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोटाच्या घटनेने पुणे शहरही दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर मात्र पुणे पोलिसांनी गाफील न राहता अशा दहशतवादी हल्ल्यांचा बीमोड करण्याच्यादृष्टीने कंबर कसण्यास सुरुवात केली. त्या घटनेनंतर पोलिसांना सातत्याने प्रशिक्षण, शस्त्र चालविणे, अत्याधुनिक शस्त्रसज्ज वाहने, वेगवेगळ्या प्रकारची पथके, शीघ्र कृती दलापासून अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर अशा सगळ्याचा वापर करून शहराला सुरक्षिततेचे कवच देण्याला पुणे पोलिसांकडून प्राधान्य दिले जात आहे. 

शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरीमध्ये १३ फेब्रुवारी २०१० रोजी बॉम्बस्फोट घडविण्यात आला. या घटनेने शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण केले. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या राज्य सरकारने पुणे पोलिसांच्या सक्षमीकरणाच्या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहण्यास सुरूवात केली. त्यादृष्टीने शहर पोलिस दलाला मनुष्यबळ उपलब्ध करून देतानाच वेगवेगळ्या पद्धतीची मदत राज्य सरकारकडून करण्यात आली. 

अतिरिक्त पोलिस आयुक्त (पोलिस प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर म्हणाले, "मागील दहा वर्षांत पुणे पोलिस दल अधिक सक्षम झाले आहे. मनुष्यबळामध्येही वाढ केली आहे. पोलिसांना प्रशिक्षण देतानाच अत्याधुनिक शस्त्रे, अद्ययावत तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे. सीसीटीएनएस प्रणालीद्वारे सर्व प्रकारचे गुन्हे व गुन्हेगारांवर वॉच ठेवला जात आहे. हजारो सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरात कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.’’ 

पुण्यात घातपाती कृत्ये घडू नयेत, यासाठी पुणे पोलिस दलामध्ये सबलीकरण, प्रशिक्षण यंत्रणा विकसित झाली आहे. क्‍यूआरटी, बीडीडीएस, फोर्स वनसारखी पथकेही आली. पोलिसांच्या गुप्तवार्ता पथकांकडूनही मिळणाऱ्या माहितीची दखल घेऊन तत्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. या सगळ्यातून अनुभवातून प्रोटोकॉल विकसित झाले असून, त्याच्या ड्रिल्स वारंवार होतात. शहरामध्ये ९ ते १० हजार पोलिस आहेत, तर ४० ते ५० लाख नागरिक आहेत. हे नागरिक आपल्या दैनंदिन जीवनात संशयास्पद व्यक्ती, वस्तूंबाबत कायम सजग, सतर्क व सक्रिय राहिल्यास सर्वसामान्य नागरिकच पोलिसांचे कान, नाक, डोळे बनून शहराच्या सुरक्षिततेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्याद्वारे घातपाती कृत्याला प्रतिबंध घालणे शक्‍य होऊ शकते. 
- डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त

अधिकारी, कर्मचारी
 अतिरिक्त पोलिस आयुक्त : ४ 
 पोलिस उपायुक्त : १० 
 सहायक पोलिस आयुक्त : २४ 
 पोलिस निरीक्षक : १५०
 सहायक पोलिस निरीक्षक : ५००
 पोलिस कर्मचारी : ८ हजार ४०० 

या गुन्ह्यातील आरोपी
 हिमायत बेग   यासीन भटकळ
 मोहसीन चौधरी   रियाझ इस्माईल शहाबांदरी ऊर्फ भटकळ  इकबाल इस्माईल शहाबांदरी ऊर्फ भटकळ  फय्याज कागझी  जबीउद्दिन अन्सारी
पथके व तंत्रज्ञान 
 बॉम्ब शोधक व नाशक पथक   शीघ्र कृती दल (क्‍यूआरटी) 
 शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण   गर्दीच्या ठिकाणी सातत्याने ‘मॉक ड्रील’ 
 विविध प्रकारची श्‍वान पथके   शस्त्रांनी सज्ज असणारी वाहने 
 गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवणारी ‘सीसीटीएनएस’ यंत्रणा 

पुण्यातील यापूर्वीची घातपाती कृत्ये 
  १९८६ : जनरल अरुणकुमार वैद्य
  १९९२ : माजी पंतप्रधान नरसिंह यांच्या नातीच्या अपहरणाचा कट
  १९९८ : स्वारगेट एसटी स्थानकावर बॉम्बस्फोट
  १९९८ : खडकी दारूगोळा कारखान्याची माहिती 
                 पाकिस्तानला पुरविणे
  २०१० : जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट
  २०१२ : जंगली महाराज रस्त्यावर बॉम्बस्फोटाचा प्रयत्न

भटकळ विरोधातील खटल्याची सुनावणी व्हीसीद्वारे घ्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहेत. सध्या खटला पुराव्याच्या टप्प्यावर आहे. कोरोनाकाळात त्यावर काही सुनावणी झालेली नाही. तर बेगच्या अर्जावर अद्याप अंतिम आदेश होणे बाकी आहे. 
- ॲड. राजा ठाकरे, विशेष सरकारी वकील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Ajit Ranade: डॉ. अजित रानडेंच्या हकालपट्टीचा निर्णय रद्द! गोखले इन्स्टिट्युटने न्यायालयात दिली माहिती

Gold-Silver Rate: चांदीने 1 लाख रुपयांचा टप्पा केला पार; सोने 81 हजारांवर, गुंतवणूक करावी का?

Latest Maharashtra News Updates Live : 25 ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद

Morning Breakfast: सकाळी नाश्त्यात बनवा स्वादिष्ट पनीर चीज हरभरा पॅटिस, आजच नोट करा रेसिपी

Share Market Today: सोन्या-चांदीत विक्रमी वाढ; जागतिक संकेत सुस्त, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

SCROLL FOR NEXT