Hadapsar News: येथील रेल्वेस्थानकावर उतरलेल्या एका राजस्थानी कुटुंबातील आईवडील व त्यांच्या दहा वर्षीय मुलीची चुकामूक होऊन ती भरकटली होती. शहीद भगतसिंग जीवरक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष बच्चूसिंग टाक यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे चुकलेल्या या मुलीला केवळ आठ तासांत तीच्या आईवडिलांकडे सुखरूप स्वाधीन करण्यात यश मिळाले आहे.
अहमदाबाद येथून हैद्राबाद येथे निघालेले राजस्थानी कुटुंब येथील रेल्वेस्थानकावर सोमवारी (ता. २७) पुढील गाडीसाठी उतरले होते. याचवेळी आई-वडिलांसोबत असलेल्या दहा वर्षाच्या मुलीची येथे चुकामूक झाली. ही मुलगी रस्ता भरकटल्याने हडपसर गाडीतळ पर्यंत चालत पुढे आली. इकडे आई-वडील व दुसरी बहीण तिचा शोध घेत होते.
हरवलेल्या मुलीला कुणाचा मोबाईल नंबरही माहीत नव्हता. ती गाडीतळ परिसरामध्ये रडत असताना अनेक नागरिकांनी तीची विचारपूस केली. मात्र, कुणालाही काही उपाय सुचत नव्हता. दरम्यान येथील शहीद भगतसिंग जीवरक्षक फाउंडेशनचे बच्चूसिंग टाक मुलीभोवतीची गर्दी पाहून तेथे गेले. चुकलेल्या या मुलीशी त्यांनी हिंदीमधून संवाद साधून विचारपूस केली. रेल्वे स्थानकावर आई-वडिलांसोबत असताना हरवल्याचे तिने सांगितले.
टाक यांनी ही बाब गांभीर्याने घेत या मुलीला पाणी पाजून हडपसर पोलीस ठाण्यात आणून पोलिसांना मुलीची माहिती दिली. त्यानंतर टाक यांनी पुढाकार घेऊन महिला पोलिसांसोबत रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मुलीच्या आई-वडिलांचा शोध घेतला. अखेर हडपसर हडपसर रेल्वे स्थानकावर मुलीचे आई-वडील रडत असल्याचे दिसून आले.
त्यांना विचारपूस केली असता ही हरवलेली मुलगी त्यांचीच असल्याचे समजले. पोलिसांनी दोन्हीही मुलींसह आई-वडिलांना पोलिसठाण्यात आणून त्यांचा जबाब घेऊन मुलीला सुखरूप त्यांच्या ताब्यात दिले. ठाणे अंमलदार मनोज सकट यांनी बच्चुसिंग टाक व आझाद सिंग यांचे कौतुक केले.
"मुलीने हरवल्याचे ठिकाण रेल्वेस्थानक सांगितले होते. मात्र, ते नेमके कोणते हे तीला सांगता येत नव्हते. मुलीचा विषय असल्याने व एकटी लहान मुलगी पाहून काही अनर्थ घडायला नको, म्हणून सर्व कामे बाजूला ठेवून तीच्या आईवडिलांचा शोध घेण्याचे ठरविले.
अंदाज घेऊन आम्ही हडपसर रेल्वेस्थानकावर गेलो. सुदैवाने तेथेच तीचे आईवडील भेटल्याने पुढील शोधाशोध करायला लागली नाही. त्या मुलीला आईवडिलांच्या कुशीत पाहिल्यावर सर्वांनी आनंद.व्यक्त केला.'
बच्चूसिंग टाक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.