पुणे

Pune News: मांजरी परिसरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्तेही खड्ड्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

Latest Pune News : खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहने आदळत आहेत. वाहनांचेही नुकसान होत आहे.

कृष्णकांत कोबल

Manajri News: चार मुख्य रस्त्यांसह परिसरातील सर्वच अंतर्गत रस्ते खड्ड्यांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. त्यातून प्रवास करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून त्यामुळे वाहनांसह शरिरही खिळखिळे होत आहे. वेगवेगळ्या तीन प्रशासनांच्या ताब्यात असलेल्या या रस्त्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नसल्याची तक्रार करीत नागरिकांनी या हलगर्जीपणा बाबत संताप व्यक्त केला आहे.

मांजरी बुद्रुक परिसरात महादेवनगर-मांजरी, मुंढवा - मांजरी हे प्रमुख जिल्हा मार्ग आहेत. तर भापकरमळा, साडेसतरानळी, अनाजीवस्ती, मोरे वस्ती, झगडे वस्ती, दरडी रस्ता, मगर महाविद्यालयामागील शिवेचा रस्ता, म्हसोबावस्ती रस्ता हे अंतर्गत रस्ते आहेत. सध्या या सर्वच रस्त्यांवर कुठे सलग तर कुठे फूटभर खोल खड्डे पडले आहेत. साईडपट्ट्याही तुटून तेथे खड्डे निर्माण झाले आहेत.

सध्याच्या मुसळधार पावसाने व खळखळणाऱ्या पाण्याने या खड्ड्यांच्या कक्षा रूंदावल्या आहेत. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, त्यांना बसपर्यंत ने आण करणारे पालक, दैनंदिन कामासाठी बाहेर पडणारे नागरिक या सर्वांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यातूनही छोटे-मोठे अपघात होत आहेत. खड्ड्यांमुळे वाहने व शरीर खिळखिळे होत आहे. वारंवार वाहतूक कोंडीही होत आहे.

शिवसेना उबाठा गटाचे शिवसैनिक प्रवीण रणदिवे यांनी रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने हडपसर - मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच, पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण या कार्यालयांना लेखी निवेदन देऊन तातडीने सर्व रस्ते दुरूस्तीची मागणी केली आहे. हे खड्डे येत्या आठ दिवसात न बुजवल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही रणदिवे यांनी दिला आहे.

गावाचा पालिकेत समावेश होऊध तीन वर्षे सरली आहेत. तरीही पालिका सुविधा पुरविण्यात टाळाटाळ करीत आहे. सध्या रस्ते वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोठून प्रवास करावा, असा प्रश्न पडत आहे. अनेक ठिकाणी जलवाहिनी, सांडपाणी वाहिनीसाठी उखडलेले अंतर्गत रस्ते पूर्ववत केलेले नाहीत. काही ठिकाणी ड्रेनेजलाईनचे चेंबर्स खचलेले आहेत. काहींची झाकणे उघडी पडलेली आहेत.

त्यामुळे परिसरातील सर्व यस्ते धोकादायक झालेले आहेत. मणके व मानेचे विकार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. वाहनचालकांमध्ये वादविवाद होत आहेत. पादचाऱ्यांची कुचंबणा होत आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहने आदळत आहेत. वाहनांचेही नुकसान होत आहे. अधिकारी व ठेकेदार मनमानी पध्दतीने व निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याने ही परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्याची तक्रार गणेश घुले, संजय घुले, राहुल खलसे, स्वप्नील वसावे, गणेश चौधरी, मनोज वाघ, दत्तात्रेय गायकवाड यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT