मंचर - आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागात निगडाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिक्षक संतोष रामचंद्र थोरात यांना सन २०२२-२३ चा थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
एक लाख रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मंगळवारी (ता.५) शिक्षक दिनानिमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.
शिक्षक थोरात यांचे प्राथमिक शिक्षण लौकी व माध्यमिक शिक्षण निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात झाले आहे.त्यानंतर त्यांनी पनवेल येथे डीएड व पुणे येथे एम.ए.बी.एड शिक्षण पूर्ण केले. गेली १६ वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून ते काम करत आहेत.
गेली साडेपाच वर्ष श्री क्षेत्र भीमाशंकर जवळ असलेल्या निगडाळे या आदिवासी शाळेत अध्यापनाचे काम करत आहेत.या पूर्वी त्यांना राज्यस्तरीय सानेगुरुजी पुरस्कार मिळालेला आहे.
लोकसहभाग व सामाजिक संस्थेद्वारा ई-लर्निंग। डिजिटल शाळा निर्मिती, तंबाखूमुक्त शाळा, गावातील आठ कुटुंबांना व्यसनमुक्त केले,
बाल आनंद मेळावे, विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी ई-साहीत्य, ज्ञानरचनावाद साहीत्य, वाचन-शब्द अंककार्ड निर्मिती, दिनविशेषानुसार बालसभा आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये अभिव्यक्ती क्षमतेचा विकास, एक वही एक पेन, वॉटरबल शाळा बांधावरची 'आदी नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केले.मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन संतोष थोरात यांनी केले.
“आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागात पटसंख्या वाढीसाठी घरोघरी भेटी दिल्या. विदयार्थी गुणवत्ता वाढीसाठी पालक मेळावे घेतले. विविध नाविन्यपूर्ण राबविले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सन्मानित होण्याचे भाग्य लाभले. हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.विद्यार्थी व गावकऱ्यांचा हा सन्मान आहे.”
संतोष थोरात, शिक्षक राज्य पुरस्कार विजेते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.