vikhe patil  sakal
पुणे

Pune News : शेवटच्या श्रावणी सोमवारी पवित्र शिवलिंगावर जल्लाभिषेक करत महापुजा करुण आरती

महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.

सकाळ वृत्तसेवा

संतोष जाधव

भीमाशंकर - 'जंगल वस्ती भीमाशंकर महाराज की जय घोष करत ब्रम्हवृंद व पुजारी बांधवांनी श्री क्षेञ भीमाशंकर येथे चौथ्या व शेवटच्या श्रावणी सोमवारी पवित्र शिवलिंगावर जल्लाभिषेक करत महापुजा करुण आरती केली.

श्री क्षेञ भीमाशंकर हे बाराज्योर्तीर्लिंगापैकी सहावे ज्योर्तिर्लिंग आहे दरवर्षी श्रावणी महिन्यामध्ये विशेषत: दर सोमवारी देशाच्या कानाकोप-यातुन लाखो भाविक व पर्यटक येत असतात.परंतु श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी तिसर्‍या व चौथ्या श्रावणी सोमवारी काही प्रमाणात कमी गर्दी पहावयास मिळते. ]

परंतु चालु वर्षी ह्या दोन्ही सोमवारी गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे पहावयास मिळत आहे. याही वर्षी चौथ्या सोमवार निमित्त शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी साठी भाविकांनी राञी बारा वाजे पासुनच दर्शन रांगेत उभे आहेत.

नियमानुसार पहाटे साडेचार ते पाच या वेळा मध्ये श्री क्षेञ भीमाशंकर मंदीरातील महापुजा व आरती भीमाशंकर देवस्थान अध्यक्ष विश्वस्त पुजारी यांच्या हस्ते करण्यात आली.भीमाशंकर देवस्थानच्या वतीने शिवलिंग व गाभारा विविध रंगाच्या फुलांनी सजविण्यात आला आहे.

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास महापुजा व आरती झाल्यावर सुमधुर असा शंखनाद व डमरु वाद्य व झांज ह्याच्या आरती वाद्यांमुळे भीमाशंकर व परिसर दुमदुमुण गेला.

या वेळी आमदार महेश लांडगे,भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.सुरेश कौदरे उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्ञी गवांदे विश्वस्त रत्नाकर कोडीलकर, दत्ताञय कौदरे, गोरक्ष कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे उपस्थित होते.

या नंतर सकाळी महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, व यांच्या पत्नी शालिनी ताई विखे, खासदार राजन विचारे, वनमंञी सुधिर मुंनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांनी पविञ शिवलिंगाचे दर्शन घेतले घेतले. दुपारी एक वाजता मुख्यमंञी एकनाथ शिंदे हे दर्शनासाठी येणार आहेत.

खेड पोलीस स्टेशनच्या वतीने मंदिर परिसर तर घोडेगाव पोलिस स्टेशनच्यावतीने एक ते पाच नंबर पार्कींग तसेच बसस्थानक परिसरामध्ये बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात घसरण कायम राहणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Latest Marathi News Updates live : नवाब मलिक यांच्या जावयाच्या मृत्यूनंतर चालकावर गुन्ह्यात वाढ

Kolhapur Elections : दक्षिण, उत्तर, इचलकरंजी, कागल, शाहूवाडीत दुरंगी लढती; राधानगरी, चंदगडमध्ये बंडखोर जोरात

Nagpur Crime: मृतदेहाला केमिकल लावण्यासाठी मागितले पैसे; नागपूरध्ये धक्कादायक प्रकार

Eknath Shinde: आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केले? होऊन जाऊ द्या "दूध का दूध पानी का पानी"

SCROLL FOR NEXT