pune  sakal
पुणे

Pune News : अन्यथा अन्य तालुके पाणी पळवतील - आर.टी.पोखरकर

सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता शामकांत निघोट यांच्या हस्ते करण्यात आले.

डी.के.वळसे पाटील

मंचर - “हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून (डिंभे धरण, ता.आंबेगाव) शेतीला मिळणाऱ्या पाण्याची बारा हजार हेक्टरची पाणीपट्टी भरली जाते. पण वापर मात्र त्यापेक्षा दुप्पटीने जास्त आहे. आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याने सिंचन होणाऱ्या क्षेत्राप्रमाणे पाणी पट्टी भरल्यास धरणातील पाण्यावर आपला हक्क शाबूत राहील. अन्यथा अन्य तालुके आपले पाणी पळवू शकतात.” अशी भिती डिंभे धरणाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आर.टी.पोखरकर यांनी व्यक्त केली.

मंचर (ता.आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात पुणे जिल्हा स्थापत्य अभियंता संघटनेच्या वतीने अभियंता दिन साजरा करण्यात आला. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेशर यांच्या प्रतिमेचे पूजन अभियंता आर.टी.पोखरकर, पुणे जिल्हा स्थापत्य अभियंता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अभियंता यतीन कुमार हुले,

सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता शामकांत निघोट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभियंते सर्वस्वी गणपत घोडेकर, जितेंद्र बागल, प्रमोद थेऊरकर, अमित डावरे, शिवाजी कट्टे, वसीम मोमिन, निखिल गटकळ, वैष्णवी गांजाळे, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील स्थापत्य अभियंते, शासकिय ठेकेदार, बांधकाम साहित्याचे उत्पादन व पुरवठा प्रतिनिधी उपस्थित होते.

“सर विश्वेश्वरय्या यांचे संपूर्ण जीवनचरित्र हे अभियंत्यांना सकारात्मक ऊर्जा देणारे असून नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या साधारणत: ८५ टक्के नागरी सुविधा या अभियांत्रिकी विभागामार्फत पुरविल्या जात असल्याने अभियंत्यांची जबाबदारी मोठी आहे. बांधकाम विश्व प्रदर्शन लवकरच भरविण्यात येईल.” असे हुले यांनी सांगितले.

पोखरकर यांच्या 'माझा सिंचन प्रवास' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. अभियंता शामकांत निघोट यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. अभियंता अनुराग जैद यांची खेड बाजार समितीच्या संचालक पदी निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अभियंता सुनिल कड, अभियंता संतोष वाव्हळ यांची भाषणे झाली. सारंग दोड, मोहसीन सय्यद व विक्रम अगरवाल यांनी व्यवस्था पाहिली. सुधीर मांदळे यांनी सूत्रसंचालन व रवींद्र वळसे पाटील यांनी आभार मानले.

डिंभे धरणात १३.५ टीएमसी पाणी साठा असून वापरासाठी १२.५ टीएमसी पाणी आहे. त्यापैकी ६.५ टीएमसी पाणी येडगाव (ता.जुन्नर) धरणात सोडले जाते. तेथून कुकडी डाव्या कालव्याद्वारे जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमळा व सोलापूरच्या काही भागाला पाणी दिले जाते. उर्वरित सहा टीएमसी पाणी आंबेगाव, शिरुर व जुन्नर भागातील शेतीसाठी दिले जाते. पण सध्या शेतकरी भरत असलेली पाणीपट्टी फक्त वीस टक्के आहे. भविष्यात आपला पाण्याचा हक्क अबाधित ठेवायचा असेल तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ओलिता खाली येणाऱ्या क्षेत्राची नोंद पाठबंधारे खात्याकडे करून पाण्याचा हक्क अबाधित ठेवावा.”

आर.टी.पोखरकर, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता डिंभे धरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात घसरण कायम राहणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Latest Marathi News Updates live : नवाब मलिक यांच्या जावयाच्या मृत्यूनंतर चालकावर गुन्ह्यात वाढ

Kolhapur Elections : दक्षिण, उत्तर, इचलकरंजी, कागल, शाहूवाडीत दुरंगी लढती; राधानगरी, चंदगडमध्ये बंडखोर जोरात

Nagpur Crime: मृतदेहाला केमिकल लावण्यासाठी मागितले पैसे; नागपूरध्ये धक्कादायक प्रकार

Eknath Shinde: आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केले? होऊन जाऊ द्या "दूध का दूध पानी का पानी"

SCROLL FOR NEXT