Pune University esakal
पुणे

Pune News : विद्यापीठाकडून गुन्हा दाखल; पंतप्रधानांविरोधात बदनामीकारक मजकूर; प्रवेश निर्बंध वाढविले

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल प्रवार यांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. ते म्हणतात

सम्राट कदम

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी वसतीगृहाच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वीत विद्यार्थी संघटनांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. आजच्या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले असून आवारात प्रवेश करण्याबाबत बंधने आणली आहेत.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल प्रवार यांनी याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. ते म्हणतात, ‘‘काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर लिहून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच काही व्यक्ती सदर मजकूर समाज माध्यमातून प्रसारित करून त्यास प्रसिद्धी देऊन सदर कृत्यात अप्रत्यक्षपणे सहभागी होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे

. या सर्व संबंधितांविरुद्ध चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.’’ विद्यापीठ या विकृत मानसिकतेचा जाहीर निषेध करीत आहे. विद्यापीठाचे पावित्र्य जपणे समाजाच्या सर्व घटकांची नैतिक जबाबदारी आहे. सदर प्रकटनाद्वारे जाहीर करण्यात येत आहे की विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण कोणत्याही प्रकारे दूषित करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.

प्रवेश निर्बंध कडक

विद्यापीठाची सुरक्षा वाढवण्यात येत असून सर्व प्रवेशद्वारांवरील बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित

मुख्य प्रवेशद्वारावर चौकशी नोंदणी करून प्रवेश देण्यात येईलसर्व वसतीगृहांमध्ये केवळ अधिकृत रहिवाशी विद्यार्थ्यांनाच बायोमेट्रिकद्वारे प्रवेश देण्यात येणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT