Crime News esakal
पुणे

Pune News: घरी जाणाऱ्या सराफा व्यावसायिकावर चोरट्यांचा गोळीबार; दागिन्याची बॅग पळवली

वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बी.टी. कवडे रोडवर सोने व्यापाऱ्यावर गोळीबार झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते

कार्तिक पुजारी

पुणे- वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बी.टी. कवडे रोडवर सोने व्यापाऱ्यावर गोळीबार झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते.(Thieves shoot at jewellers businessman on his way home Bag of jewels stolen)

दिवाळीचे दिवस असल्याने लोकांची सोने-चांदी खरेदी करण्याची लगबग पाहायला मिळत आहे. त्यातच सोने-चांदी घरी घेऊन जात असताना एका सराफा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सराफाकडील दागिने हिसकवण्याचा तीन चोरट्यांनी प्रयत्न केला. रात्री दहा वाजताच्या सुमाराची ही घटना आहे.

प्रदीप मदनलाल ओसवाल (वय ३५) असं सराफाचं नाव असून ते मुंढव्याचे रहिवाशी असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पायावर दोन आणि तोंडावर एक गोळी लागलीये. सध्या त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ओसवाल यांचे हडपसरमधील सय्यदनगरमध्ये सराफी दुकान आहे. दुकान बंद करुन ते घराकडे निघाले होते.(Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक ओसवाल यांची छोटीशी सराफा पेढी आहे. ते रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून वडिलांसमवेत दुचाकीवरून घरी निघाले होते. बीटी कवडे रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी प्रतीक यांच्या दिशेने पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या.

प्रतीक यांच्या मांडीवर आणि गालावर गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत

बाणेरमध्ये सदनिकेवर गोळीबार

बाणेर येथील आलोमा काउंटी सोसायटीतील एका सदनिकेच्या बेडरूमच्या दरवाजावर एकाने पिस्तुलातून गोळ्या झाडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी एका कोरियन नागरिकाने फिर्याद दिली आहे. चतु:शृंगी पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर मुंढव्यातील केशवनगर भागात रविवारी सायंकाळी टोळक्याने एका तरुणाला मारहाण केली. तसेच, त्याच्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT